….. म्हणून पुन्हा पेटू शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वाद

मुंबई ; पोलीसनामा ऑनलाईन- सध्या कोस्टलरोडसाठी पूर्वतयारीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र, शिवसेनेच्या या ड्रीम प्रोजेक्टला शिवसेनेचाच पारंपारिक मतदार कडाडून विरोध करत आहे.कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे . आज संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असून त्या आधीच राज ठाकरेंनी तिथे जाऊन मच्छिमारांची भेट घेतली कोस्टल रोड मुळे मासेमारी धोक्यात येणार असल्यानं कोळी लोकांचा याला प्रचंड विरोध आहे . काही दिवसांपूर्वी याची माहिती कोळी बांधवांच्या वतीने राज ठाकरे यांना देण्यात आली . भेटीच्या वेळी तिथल्या स्थानिकांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला.तांत्रिक गोष्टी पहिल्या तर प्रशासन यातून मार्ग काढू शकतो. मात्र प्रशासनाने या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केलं तर संघर्ष करावा लागेल अशी भूमिका आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे , यातून मार्ग काढण्यासाठी राज आता मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत.
कोस्टल रोड मुळे होणाऱ्या अडचणी 
प्रिन्सेस स्ट्रीट पासून ते कांदिवली पर्यंत असा एकूण ३५.६ किलोमीटर लांबीचा हा रोड असणार आहे. समुद्र किनारपट्टी लगत भराव टाकून पूल आणि बोगदा असं अडथळ्यांच बांधकाम असणार आहे. मात्र प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सि – लिंक च्या कोस्टल रोड च्या टप्प्याला मोठा विरोध आहे. कारण इथे आधीच वांद्रे वरळी  सि – लिंक उभा आहे यांनी याच ठिकाणी कोस्टल रोड चे पिलर उभे राहतील यामुळे समुद्रात होड्यांची ये जा करणं कठीण होणार आहे
वरळी कोळीवाडा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार संघ म्हणून ओळखला जातो , परंतु कोस्टल रोड मुळे तेथील नागरिक नाराज असल्यामुळे शिवसेनेची हि वोट बँक शिवसेने पासून दूर जाईल अशी चिन्ह आहेत त्यामुळे या मुद्द्यावर मनसे – आणि शिवसेनेमध्ये चांगलेच वातावरण तापणार असल्याचं दिसून येत
कोळी समाजाच्या मागण्या काय आहेत?
कोस्टल रोडच्या मार्गातून नौकांची येजा करण्यासाठी दोन पिलर मधील अंतर कमीतकमी २०० मीटर असावं
समुद्रातील मासेमारी पारंपरिक जागा मासेमारीसाठीच राखीव ठेवावी
माऊंटमेरी ते बाण गंगेपर्यंत गेली अनेक वर्ष  पारंपरिक मासेमारी पद्धतीच्या जागा विखुरलेल्या आहेत त्या सुरक्षित ठेवाव्या
वादळात लोटस जेट्टी येथे कोळी समाज आपल्या नौका नांगरत असतात , ते बंदर सुरक्षित राहावे
कोस्टल रोड साठी वरळी ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत समुद्रात भराव टाकला जाईल त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी कोळीवाडा आणि आजूबाजूच्या प्रदेशात शिरण्याची दात शक्यता आहे
 कोस्टल रोड हा जरी विकासाचा महामार्ग असला तरी या मध्ये अंतर्गत अडचणी खूप मोठ्या आहे जर भराव टाकल्यामुळे भरतीच्या वेळी समुद्रात ला पाणी आसपासच्या भागांमध्ये शिरला तर हजारो लोकांच्या ते जीवावर बेतू शकते
कोस्टल रोडमुळे परंपरागत मासेमारीचा व्यवसाय धोक्यात येत असल्याच्या कारणामुळे कोळी बांधवांनी यास विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्याला भेट देऊन येथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या कल्याण मेट्रो प्रकल्प भूमिपूजन समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डावलल्याचा वचपा काढत मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने रविवारी महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गाचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते ठेवले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डावलण्यात आले आहे. दुसरीकडे, या महामार्गाचे काम आधीच सुरू झाले असल्याचे सांगत भाजपाने आता भूमिपूजनाच्या औचित्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट पासून ते कांदिवली पर्यंत असा एकूण ३५.६ किलोमीटर सागरी महामार्गाच्या भूमिपूजन समारंभाला उद्धव यांच्याबरोबरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती असेल; पण मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्याची तसदी महापालिकेने घेतलेली नाही. प्रमुख पाहुण्यांमध्ये भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा सोडले तर भाजपाचे कुणीही नाही. कल्याणमध्ये मेट्रोचे श्रेय एकट्याने घेत भाजपाने शिवसेनेवर कुरघोडी केलेली असताना आता सागरी महामार्गाचे श्रेय स्वत:कडे घेत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना ठेंगा दाखविला आहे. या महामार्गाची उभारणी मुंबई महापालिका करणार आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना एक पत्र देऊन रविवारी सागरी महामार्ग भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यास सांगितले होते. शनिवारी सकाळी घाईघाईने या समारंभाच्या पत्रिका छापण्यात आल्या. २ हजार १२६ कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गाची उभारणी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (एचसीसी) करणार आहे