संजय निरूपमांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

संजय निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटण्याचा वेळ मागीतला होताा. आज सकाळी त्यांना मुख्यमंंत्र्यांचा मेसेज आला त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

तर काल काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. संजय निरूपम यांना मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून हटवावं अशी मागणी काही कांँग्रेस कार्यकर्त्यांनी केली असल्याचं समजतंय. त्यामुळे काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी संजय निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्यांचं बोललं जातंय.

[amazon_link asins=’B07D9G1GHB,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b131c90-ba77-11e8-b10e-3dce52060246′]

दरम्यान, मी राहुल गांधी यांच्याशी एकनिष्ठ आहे. त्यांनी मला मुंबई काँग्रेसची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मी मुंबईकरांच्या विविध प्रश्नांसाठी लढा देणार आहे. राहुल गांधी सांगतील तोपर्यत मी अध्यक्षपदावर राहील, असं संजय निरूपम यांनी सांगीतलं आहे.

संजय निरूपम यांना अध्यक्षपदावरून हटवावं या मागणीमुळे काँग्रेसचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. संजय निरूपम यांना हटवून त्या जागी मिलींद देवरा यांना अध्यक्ष करावं, अशी काही काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे.

महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग