‘कोरोना’चा जास्त प्रादुर्भाव असलेल्या ‘मुंबई’तून दिलासादयक ‘बातमी’, मुंबईकरांनी ‘हे’ करुन दाखवलं

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन  –  महाराष्ट्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. प्रत्येक दिवशी कोरोनाबाधितांचे आकडे बदल असून कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झाला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, मुंबई महानगर पालिकेने विभागवार कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची यादी जाहीर केली आहे. ही यादी मुंबईकरांना दिलासा देणारी ठरणार आहे.

मुंबई महापालिकेने बुधवारी कोरोनाबाधित लोकं बरे होऊन आपल्या घरी जात असल्याची आकडेवारी नकाशासह प्रसिद्ध केली आहे. या नकाशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या वरळी विभागात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची सख्या जास्त असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. वरळी विभागातील 67 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत.

कोरोना व्हायरसने ज्या विभागात गळ्यात जास्त थैमान घातले आहे तोच विभाग एक आशावादी चित्र घेऊनही पुढे येत आहे. वरळी येथून योणारी आनंदाची बातमी ही सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर कोशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईतील बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या मुंबईकरांच्या मनावर फुंकर घालणारी असली तरीही रुग्णांचा वाढता आकडा हा सुद्धा चिंता वाढवणारा आहे.

मुंबईतल्या 24 वॉर्डावर नजर टाकली तर असे दिसून येते की, वरळी भागात 487 रुग्ण असून त्यापैकी 67 रुग्ण बरे झाले आहेत. सगळ्यात कमी 20 रुग्ण दहिसर विभागात असून त्यापैकी 6 रुग्ण बरे झाले आहेत. कुर्ला विभागात 240 रुग्ण असून केवळ 8 रुग्ण बरे झाले आहेत. या विभागात रुग्ण बरं होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या विभागात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात पालिकेला यश आलेले नाही.