Mumbai Corona | एप्रिल 2020 च्यानंतर मुंबईत समोर आली एका दिवसातील कोरोनाची सर्वात कमी प्रकरणे, जाणून घ्या

मुंबई – Mumbai Corona | मुंबईत सोमवारी कोरोना व्हायरसची 190 प्रकरणे समोर आली. ही एप्रिल 2020 च्या नंतरची मुंबईत एका दिवसात कोरोना प्रकरणांची सर्वात कमी संख्या (Mumbai Corona) आहे. तर, सोमवारी कोरोना संसर्गामुळे मुंबईत तीन लोकांचा मृत्यू झाला. बृहन्मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) एका अधिकार्‍याने याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नवीन प्रकरणासह कोरोनाच्या एकुण प्रकरणांची संख्या 7,39,526 झाली आहे, तर मृतांचा एकुण आकडा 15,992 च्या पुढे गेला आहे.

एप्रिल 2020 च्या नंतर पहिली वेळ आहे जेव्हा मुंबईत कोरोनाच्या दैनिक प्रकरणांची संख्या 200 च्या खाली गेली आहे, तर या महिन्यात असे तिसर्‍यांदा झाले आहे जेव्हा शहरात कोरोनाने होणार्‍या मृतांची संख्या तीन राहिली आहे. यापूर्वी 3 आणि 9 ऑगस्टला शहरात कोरोनाने मृत्यूची तीन-तीन प्रकरणे समोर आली होती.

याशिवाय, लागोपाठ तिसर्‍या दिवशी मुंबईत झोपड्या आणि चाळी कंटेन्मेंट झोनमुक्त राहिल्या. तर, मुंबईत सील केलेल्या इमारतींची संख्या कमी होऊन 21 झाली आहे. एखाद्या परिसरात किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये 5 लोक कोरोना संक्रमित आढळले तर बीएमसी त्या परिसराला किंवा बिल्डिंग सील करते.

लागोपाठ कमी होत प्रकरणांची संख्या
मुंबईत कोरोना प्रकरणात लागोपाठ घट दिसत आहे. रविवारी मुंबईत कोरोनाची 267 नवीन प्रकरणे समोर आली होती, तर 4 लोकांचा मृत्यू झाला होता. मागील 24 तासात मुंबईत कोरोनाच्या 26,484 टेस्ट करण्यात आल्या, यासोबत मुंबईत कोरोना टेस्टची संख्या 86,78,746 वर पोहचली आहे.

मागील 24 तासात 271 लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या येथे 2,749 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत.
रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. या वर्षी मुंबईत 4 एप्रिलला कोरोनाची सर्वाधिक 11,163 प्रकरणे
समोर आली होती. तर 1 मे रोजी शहरात सर्वाधिक 90 मृत्यू झाले होते.

हे देखील वाचा

ATM Fraud | ATM फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी ठवा लक्षात, होणार नाही फसवणूक, जाणून घ्या

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना इशारा, म्हणाले – ‘… तर तुमची पोलखोल करणार’

Fuel Price | अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले, अखेर का कमी केल्या जात नाहीत इंधनाच्या किमती, हे आहे कारण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Corona vaccination | union govt says cumulative covid vaccine doses administered in india cross 55 crore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update