विविध देशात अडकलेले 6 लाख पेक्षा अधिक भारतीय परतले ‘मायदेशी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूमुळे जगभरात अडकलेल्या भारतीयांनी मायदेशी परतण्यासाठी सुरु केली आहे. ‘वंदे भारत मिशन’, विशेष उड्डाणे, नौदलाच्या जहाजांद्वारे ६ लाखपेक्षा अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत.

कोरोनामुळे जगात अनेक ठिकाणी लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे जगभरातील विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्याचा मार्ग बंद झाला होता. या नागरिकांमध्ये निराशेचे आणि चिंतेचे वातावरण होते. मात्र, केंद्र सरकारने या नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी ‘वंदे भारत मिशन योजना’ राबवली. तसेच नौदलाच्या विशेष जहाजांद्वारे मायदेशी परतण्याची संधी उपलब्ध करुन दिली.

विविध आखाती देश, अमेरिका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, यासह विविध देशांत नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त गेलेले हजारो भारतीय नागरिकांना या माध्यमातून भारतात परतणे शक्य झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यामध्ये ‘वंदे भारत मिशन’ द्वारे एअर इंडियाची विशेष विमानांची उड्डाणे झाली. केवळ भारतात आणण्याचेच काम नव्हे तर काही जणांना भारतातून इतर देशांत पाठवण्याचे काम देखील याद्वारे केले.

11 जुलै रोजी 29 विविध विमानांतून 5746 भारतीय भारतात परतलेत. शारजाह, बहरीन, मस्कत, दुबई, कौलालम्पूर, नेवार्क, टोरंटो, सँनफ्रान्सिस्को, दोहा, लंडन, मनिला, शिकागो, सिंगापूर यासह विविध देशांतून रविवारी भारतात 5746 प्रवासी परतले आहेत. यापैकी मुंबईत मस्कत, नेवार्क आणि बिश्सकेकहून विमाने दाखल झाली असून त्यामधून प्रवासी मुंबईत परतले आहेत.