‘कोरोना’ झाल्याची माहिती लपवली, गरोदर महिलेमुळं डॉक्टरांनाही लागण !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गरोदर महिलेला कोरोनाची लागण झालेली असतानाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. असं असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून डॉक्टरांनी त्या महिलेची यशस्वी प्रसुती केली. आता डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील मालाड भागातील ही घटना आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, एक दाम्पत्य 22 ऑक्टोबर रोजी लाईफवेव्ह हॉस्पिटलध्ये पहाटे अडीचच्या सुमारास दाखल झालं. या महिलेला तातडीनं वार्डात हलवण्यात आलं. डॉ. चार्मी देशमुख (Dr. Charmi Deshmukh) यांनी गरोदर महिलेला कोविड चाचणी केली आहे का अशी विचारणा केली होती. परंतु या महिलेनं चाचणी करण्यास नकार दिला. त्यानंतर डॉ. देशमुख यांनी नियमांप्रमाणे महिलेची कोविड टेस्ट केली. रिपोर्टमधून महिलेला कोरोना लागण झाल्याचं समोर आलं.

अखेर महिलेच्या पतीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधी 8 च्या सुमारास पॉझिटीव्ह आली होती अशी कबुली दिली. इतकंच नाही तर तिला कोविड रुग्णालयात दाखल करावे लागले असते आणि बाळाचा जन्मही तिथंच झाला असता म्हणून आम्ही खोटं बोललं असंही पतीनं सांगितलं.

महिलेची प्रसुतीची वेळ जवळ आल्यानं लाईफव्हेव हॉस्पिटलच्या प्रशासनानं तात्काळ तिला मालाड येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलवलं. त्याच दिवशी या महिलेनं एका बाळाला जन्म दिला. डॉ देशमुख यांच्या टीमन जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसुती केली.

4 दिवसांनी डॉ. देशमुख यांना ताप आला. त्यामुळं त्यांनी तातडीनं कोविड टेस्ट केली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. पहिल्या आठवड्यातच त्यांनी प्रकृती खालावली आणि ऑक्सिजन लेव्हलही कमी झाली. त्यामुळं त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. दरम्यान डॉ. देशमुख यांच्या 8 वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.