mumbai corona vaccination | मुंबईत कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधातून मिळणार सवलत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – mumbai corona vaccination |कोरोना (Corona) ची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र अद्याप धोका कायम आहे. नागरिकांकडून दररोज लोकल सुरु करण्याची मागणी होत आहे. मात्र बाधितांची संख्या वाढत असल्याने तूर्त तरी सरकार लोकल सुरु करण्याच्या विचार करत नसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने (State Government) केल्या जिल्ह्यांच्या विभागणीनुसार मुंबई तिसऱ्या टप्प्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू लागू आहेत. अजूनही अत्यावश्यक सेवा (Essential service) वगळता इतरांना कार्यालये आणि इतर ठिकाणी सरसकट प्रवेश दिला जात नाही. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काही सवलती देण्याचा विचार पालिकेकडून सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या नागरिकांनी लशींच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांना लोकलवगळता अन्यत्र सवलत देण्याविषयी सकारात्मक विचारविनिमय सुरू आहे. यावर १५ जुलैला मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

जिल्हास्तरीय पातळीवर कोरोना पॉझिटिव्हिटी दरा (Corona Positivity Rate) नुसार त्या जिल्ह्यातील निर्बंध कमी केले जात आहेत. मात्र सध्या बाधितांची संख्या वाढू लागल्याने काही जिल्ह्यात आजही कडक निर्बंध आहे. मुंबईत पॉझिटिव्हिटी दर दोन टक्के असला तरीही येणारा उत्सवांचा काळ आणि तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका यामुळे मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक वगळता सर्वसामान्यांना विविध आस्थापना आणि इतर ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. सर्वसामान्यांना प्रवास निर्बंधापासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लोकल सुरु नसल्याने बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी व खासगी गाड्यांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

दररोज प्रवासाच्या समस्येला तोंड दयावे लागत असल्याने सर्वाना लोकल प्रवास मुभा द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोरोना नियंत्रणात असल्याने सर्वसामान्यांनी सध्याचे निर्बंध कमी करावेत अशी मागणी केली आहे. दोन लस मात्रा झालेल्यांना लोकल प्रवास खुला करण्याची सूचना केली जात असून पालिकेनेही आता लोकांना दिलासा देण्याचा विचार सुरु केला आहे. त्यासाठी १५ जुलैच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे.

यासंदर्भात बोलताना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (bmc additional commissioner suresh kakani) म्हणाले की, लसीकरणा (Vaccination) वर भर देण्यात आला असून मुंबईत आतापर्यंत ५९ लाख २९ हजार जणांनी लस घेतली आहे. त्यापैकी, ४६ लाख ८१ हजार ७८० जणांनी लशींची पहिली मात्रा घेतली आहे. त्याचप्रमाणे १२ लाख ४७ हजार ४१० जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे. त्यामुळे लशीचे दोन डोस घेतलेल्यांना विविध कार्यालयांसह अन्यत्र प्रवेश देण्यासाठी सवलत देण्याविषयी पालिकेकडून विचार सुरू आहे. मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title :  mumbai corona vaccination | bmc administration has started discussion about giving concessions elsewhere except local train

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह
2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि
दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात;
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान

Kappa variant | डेल्टानंतर आता आला कोरोनाचा नवीन कप्पा व्हेरिएंट, जाणून घ्या याची लक्षणे आणि कसे पडले याचे नाव