‘रेप नव्हे प्रेम होतं मीलॉर्ड…’, मुकबधीर आरोपीची कोर्टाकडून निर्दोष ‘मुक्तता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पॉक्सो कायद्यांर्गत आरोपी म्हणून ताब्यात असणाऱ्या एका मुकबधीर तरुणाची निर्दोष मुक्तता झाली आहे. 2014 साली या तरुणाला अपहरण आणि बलात्कार प्रकरणी तिरुपतीमधून त्याला ताब्यात घेतलं होतं. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तरुणाची निर्दोष सुटका झाली आहे. तब्बल 4 वर्षांनंतर तरुण निर्दोष सुटला आहे. सदर मुकबधीर तरुणानं तरुणीवर बलात्कार केला नसून तरुणीनं तिच्या मर्जीनं शारीरिक संबंध ठेवले होते असं समोर आल्यानं कोर्टानं त्याची निर्दोष मुक्तता केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?
चार वर्षांपूर्वी एक मुकबधीर तरुण एका 15 वर्षाय तरुणीला घेऊन पळून गेला होता. दोघंही तिरुपती मध्ये रहात होते. त्यांनी एक घर घेतलं होतं. तरुण मजुरी करून पोट भरत होता. 2015 साली मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर त्या तरूणाला तिरूपतीमधून पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्याला ट्रायल कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी तरुणानं विनंती केली होती की, प्रेम करण्यासाठी कोणतीही शिक्षा दिली जाऊ नये. मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. मी लग्न केलं. आहे. असं त्या तरुणानं सांकेतिक भाषेत पोलिसांना सांगितलं. या तरुणावर अपहरण आणि बलात्कारचा गुन्हा दाखल झाला होता.

तरुणाचा हेतू हा संसार करण्याचा होता. त्याला अपहरण करायचं नव्हतं. मुलीनं स्वत:हून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. फक्त मुलगी अल्पवयीन आहे या एका गोष्टीवरून हा गुन्हा तरुणानं केला असा अर्थ घेणं चुकीचा आहे असं कोर्टानं सांगितलं. याशिवाय 2015 साली मॅजेस्ट्रेटमध्ये मुलीनं स्वत:च्या मर्जीनं पळून गेल्याचं आणि संबंध ठेवल्याचं कबूल केलं होतं. याशिवाय तिरुपतीला असताना मुलीनं एकदाही पळून जाण्याचा प्रयत्न केला नव्हता त्यामुळं अपहरणाचा प्रकार आहे असं म्हणता येणार नाही असंही कोर्टानं म्हटलं. मेडिकल रिपोर्टमध्येही कोणत्या जबरदस्तीचा उल्लेख नव्हता. त्यांनी प्रेम असल्यानं शारीरिक संबंध ठेवल्याचं यातून समोर आलं होतं.

सदर तरूणाला बोलता आणि ऐकता येत असल्यानं सांकेतिक भाषेचा वापर करून ही केस चालवण्यात आली होती. त्यासाठी विशेष शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व तपशील आणि अहवाल पाहून कोर्टानं मुकबधीर तरुणाला दोषमुक्त केलं.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/