‘आधार’कार्ड नागरिकत्वाचा ‘पुरावा’ होऊ शकत ‘नाही’ : न्यायालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा होऊ शकत नाही असे मुंबईच्या न्यायालयाकडून सांगण्यात आले. मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका 35 वर्षीय बांगलादेशी महिलेला भारतात अवैधपणे प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी दोषी ठरवले. या महिलेला न्यायालयाने एक वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

या महिलेचे नाव आहे ज्योती गाझी उर्फ तस्लिमा रबिउल. ती दहिसर पूर्व भागात सध्या वास्तव्यास आहे. याच प्रकरणी न्यायालयाने तिला भारतात अवैधरित्या प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी दोषी ठरवले. पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा सेल डीड इत्यादी कागदपत्र कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे असे न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वसाधरणपणे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जन्म दाखला, जन्म ठिकाण, आई वडिलांचे नाव आणि नागरिकत्वाचा पुरावा असणे आवश्यक आहे. अनेकदा आजी आजोबांच्या जन्माचे ठिकाणं देखील गृहीत धरलं जातं असे ही न्यायालयाने स्पष्ट केले.

नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी भारतात आलेल्या विदेशी नागरिकांना पुरावे किंवा दस्तावेज सादर करणं बंधनकारक आहे अशी टिप्पणी न्यायालयाने हा निकाल देताना केली. मी बांगलादेशी असून 15 वर्षांपासून मुंबईत राहत आहे असा तावा रबिउलनं केला होता. त्यावरील हे सिद्ध झाले की त्या बांगलादेशी नागरिक आहे आणि त्यांनी अवैध पासपोर्ट किंवा दस्तावेज नसताना भारतात प्रवेश केला. न्यायालयाने हा युक्तीवाद देखील फेटाळून लावला की त्या एक महिला आहेत म्हणून त्यांना सूट द्या. जर अशा प्रकारे सूट दिली तर राष्ट्रीय सुरक्षा आणि भारतीय नागरिकांच्या अधिकारावर गदा येऊ शकते. अशा प्रकारच्या बेकायदा नोंदीमुळे विदेशी भारतीय अर्थव्यवस्थेला मारक ठरु शकतात असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like