Mumbai Crime | माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! 11 वर्षीय मुलीवर सोसायटीच्या वॉचमनकडून लैंगिक अत्याचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | नुकतंच घडलेल्या मुंबईच्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणाने (Sakinaka rape and murder case) मुंबई हादरलं. या अमानुष घटनेची मुंबईतच नाही तर राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच आणखी एक हादरवून टाकणारी धक्कादायक घटना मुंबईतच (Mumbai Crime) घडली आहे. तेथील रहिवासी सोसायटीच्या वॉचमनने (Watchman) एका 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

हा खळबळजनक प्रकार कांजुरमार्गमध्ये (Kanjurmarg) घडला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन पोलिसांनी आरोपी वॉचमनला रात्री अटक केली असून, वॉचमनविरोधात पोलिसांनी आयपीसी 354 आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आज या आरोपी वॉचमनला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते.
गुप्तांगात रॉड घुसविण्यात आल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती.
या आरोपीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे आगोदरच मुंबई हादरली आहे.
त्यातच सोसायटीच्या वॉचमनने मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक घटना समोर आली आहे.

Web Title : Mumbai Crime | 11 year old girl was molested societys watchman kanjurmarg arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा जास्तच्या टॅक्स चोरीत सहभाग – प्राप्तीकर विभाग

Maharashtra Rains | विकेंडपासून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ 4 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट

Pune Crime | चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; वारजे माळवाडीच्या रामनगर येथील घटना