क्राईम स्टोरीमुंबई

Mumbai Crime | धक्कादायक ! बांगलादेशातून 5 हजार मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात अडकवलं; अखेर आरोपीला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Mumbai Crime | एक नाहीतर तब्बल पाच हजारांहून जादा मुलींना वेश्या व्यवसायाच्या (human trafficking and prostitution) जाळ्यात ओढणा-या नराधम (Mumbai Crime) आरोपीला अखेर पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. विजय कुमार दत्त (Vijay Kumar Dutt) असं त्या आरोपीचं नाव आहे. स्वत त्याने मुलींना देहव्यापारात ढकलल्याची कबुली दिलीय. 25 वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आलेला आरोपी विजयला साथीदार बबलूसह एसआयटीच्या (SIT) पथकानं बाणगंगा परिसरातील कालिंदी गोल्ड सिटी येथून अटक केले आहे. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे पुढं येत आहे.

 

याबाबत माहिती अशी, विजय (Vijay Kumar Dutt) याने मुंबईतील नालासोपारा परिसरातील दाट वस्तीत आपला अड्डा बनवला होता.
तर, आरोपी विजय (Accused Vijay) हा उज्ज्वल, बबलू आणि सैजल या अन्य साथीदारांच्या मदतीने इंदूरला वेश्या व्यवसायाचं (human trafficking and prostitution)
केंद्र बनवण्याच्या प्रयत्नात होता. इंदूरहून सुरत, राजस्थान, मुंबई (Mumbai Crime) आणि इतर प्रमुख ठिकाणी मुलींचा पुरवठा करणारी साखळी तयार करण्याचा देखील त्याचा प्रयत्न होता.
तसेच, त्याने भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रही तयार केलेत.
तर, बायकोला भेटायला जाण्याच्या कारणातून तो अनेकदा बांगलादेशला दौरे करायचा.

 

तर, विजय हा बांगलादेशातील (Bangladesh) शबाना (Shabana) आणि बख्तियार (Bakhtiar) यांच्या मदतीने गरीब घरातील मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा.
नोकरी देण्याचं आमिष दाखवून आरोपी संबंधित मुलींना अवैध पद्धतीनं भारतात आणायचा.
येथे आणल्यानंतर आरोपी काही दिवस या मुलींना आपल्या सोबत ठेवायचा.
तसेच त्यांना वेश्या व्यवसायासाठी तयार करायचा.
तर, तो देखील अनेकदा त्यांच्यावर बलात्कार (Rape) करायचा.
पीडित मुलींनी पुन्हा बांगलादेशला जाण्याचं विचारता त्यांना गोळी घालून ठार मारण्याची धमकीही विजय देत होता.

दरम्यान, विजयने मागील 25 वर्षामध्ये सुमारे 5 हजारहून जास्त मुलींना देहव्यापारात अडकवले आहे.
धक्कादायक म्हणजे त्यानं आजपर्यंत दहा मुलींशी लग्न केलं आहे. तसेच त्याला 100 हून जास्त गर्लफ्रेंड आहेत.
या सर्वांना त्यानं वेश्या व्यावसाय करण्यास भाग पाडलं आहे. तसेच, त्याचं कमिशनही स्वत:कडेच ठेवत होता.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून या आरोपीचा मुंबई पोलिस (Mumbai Police) शोध घेत होते.
मात्र, तो हाती लागत नव्हता. पण, यावेळी पोलिसांनी नालासोपारा (nalasopara) परिसरात धाड टाकल्यानंतर आरोपी विजय (Accused Vijay) इंदूरला पसार झाला होता.
मात्र, एसआयटी पथकाच्या (SIT Squad) मदतीने आरोपी विजयला अटक (Arrested) केली आहे.

 

Web Title : Mumbai Crime | 5000 girls human trafficking from bangladesh to india for prostituti accused arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan योजनेचा 10वा हप्ता लवकरच होईल जारी, परंतु काही शेतकर्‍यांच्या खात्यात येतील दुप्पट पैसे

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक, 2 पिस्टल जप्त

Roshan Bhinder | वेब सीरिजच्या नावाखाली 37 लाखांच्या फ़सवणुकीप्रकरणी ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शिकेला अटक 

Back to top button