Mumbai Crime | टूथपेस्ट समजूर रॅट किलरने स्वच्छ केले दात, अखेर मुलीचा झाला मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | मुंबईतील धारावी परिसरात राहणार्‍या एका 18 वर्षाच्या मुलीने उंदीर मारण्याच्या औषधाला टूथपेस्ट समजून दात स्वच्छ केले. यानंतर मुलीचा मृत्यू (Mumbai Crime) झाला. पोलिसांनी सांगितले की, ही घटना 3 सप्टेंबरच्या सकाळी तिच्या घरी घडली, तिचे नाव अफसाना खान आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफसाना नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करण्यासाठी गेली. परंतु चुकून तिने टूथपेस्टच्या जवळ ठेवलेली उंदीर मारण्याची क्रीम ब्रशवर घेऊन ब्रश केला. नंतर थोड्यावेळातच तिला चव आणि वास येणे बंद झाले. तिने तोंडातून विष बाहेर करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला बाथरूममध्ये चक्कर येऊ लागली.

घरातील लोकांना सांगितले नाही
घरातील लोक ओरडतील म्हणून तिने कुणालाही न सांगताच काही औषधे घेतली. कारण तिला पोटात गंभीर वेदना आणि अस्वस्थता जाणवत होती, परंतु बरे वाटले नाही. यानंतर तिला तीन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

प्रकृती बिघडत गेल्यानंतर तिने अखेर आपल्याकडून झालेली चूक घरच्यांना सांगितली.
नंतर तिला 12 सप्टेंबरला उपचारासाठी सर जेजे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
मात्र, तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

अफसानाच्या कुटुंबात आई-वडील, एक मोठी बहिण आणि दोन छोटे भाऊ आहेत.
अफसानाने लॉकडाऊन दरम्यान शाळा सोडली होती.
तिचे कुटुंब फळाचा छोटासा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवते.

Web Titel :- Mumbai Crime | a girl brushes teeth with rat poison cream instead of toothpaste dies in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तुमचा मोबाइल नंबर बदलला आहे का? तात्काळ Aadhaar Card सोबत करा लिंक, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Pune Crime | पुण्याच्या कोथरूडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीनं केलं पत्नीच्या मोबाईलमध्ये ‘स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर’ सॉफ्टवेअर डाऊनलोड, पुढं झालं असं काही की प्रकरण…

PM Modi | पीएम मोदींनी सांगितलं आपल्या बालपणीचे अलीगढ ‘कनेक्शन’, म्हणाले – ‘वडिलांकडे पैसे ठेवत होता अलीगढचा मुस्लिम व्यापारी’