Mumbai Crime | किरकोळ कारणावरून सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि त्याच्या पत्नीने मोलकरणीला केली मारहाण

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | जादा कामाला नकार देत मोलकरणीने काम सोडले. त्याचा राग असतानाच तिच्या मुलाकडून चुकून फोन लागल्याने सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि त्याच्या पत्नीने मोलकरणीला (Maid) मारहाण (Beating) करत जातीवाचक शिवीगाळ केली. हा प्रकार सोमवारी रात्री सीबीडी येथील आंबेडकर नगर (Mumbai Crime) परिसरात घडला. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात (CBD Police Station) सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील (API Sandeep Patil) व त्यांची पत्नी ऋचा पाटील (Richa Patil) यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत (Atrocities Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नेरुळ पोलीस ठाण्यात (Nerul Police Station) संदीप पाटील हे कार्यरत असून ते सीबीडी पोलीस वसाहतीत (CBD Police Colony) राहतात. त्यांची पत्नी ऋचा पाटील या यूपीएससीची (UPSC) तयारी करत आहेत. त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला 800 रुपये वेतन देऊन सर्वच कामे सक्तीने करून घेतली जात होती. त्यामुळे जादा कामाला नकार देत मोलकरणीने संदीप पाटील यांचे काम सोडून दिले होते. (Mumbai Crime)

 

यावरून तिला इतर ठिकाणची कामेही गमवावी लागली होती.
दरम्यान, सहा महिन्यानंतर सोमवारी नकळतपणे घरातील मोबाईलवरून मोलकरणीच्या मुलाकडून संदीप पाटील यांना फोन लागला गेला. त्यावरून चिडून जाऊन त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री आंबेडकर नगर येथे जाऊन मोलकरणीसह तिच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच सीबीडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाटील दाम्पत्याच्या तावडीतून मोलकरीण आणि तिच्या पतीची सुटका केली. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Mumbai Crime | atrocity case filed against assistant police inspector API and his wife

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा