धक्कादायक ! मुंबईत पकडले 5 वी पास ‘डॉक्टर’, ‘डिग्री’ शिवाय चालवत होते ‘क्लिनीक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबई गुन्हे शाखेने मंगळवारी ६ ठिकाणांवर छापा टाकून भोंदू डॉक्टरांना अटक केली आहे. जे की हकीम म्हणून सुमारे पाच वर्षांपासून काम करत होते. मुंबईच्या पूर्व उपनगरी भागात गुन्हे शाखेने छापा टाकला असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पकडलेल्या डॉक्टरांकडे मूलभूत शालेय शिक्षणही नव्हते आणि त्यातील काही तर फक्त पाचवी उत्तीर्ण होते.

रुग्ण म्हणून दाखल झाले पोलिस

अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांचे बहुतेक दवाखाने हे गोवंडी भागात असून तेथील लोकसंख्या अतिशय दाट आहे. हे डॉक्टर केवळ वैद्यकीय सल्लेच देत नाहीत तर बऱ्याच रूग्णांवर शस्त्रक्रिया देखील करतात. मुंबई गुन्हे शाखेची टीम रुग्ण बनून दवाखान्यात माहिती गोळा करण्यासाठी पोहोचली होती त्यानंतर या डॉक्टरांचे भांडे फुटले. तपासात समोर आले की हे सर्व डॉक्टर कोणतेही वैद्यकीय शिक्षण व प्रमाणपत्र न घेताच परिसरात दवाखाने चालवित होते.

गुन्हे शाखेला तपासात आढळून आले की हे सर्व डॉक्टर म्हणून काम करत होते आणि चौकशीच्या दरम्यान ते प्रश्न टाळत असल्याचे दिसून आले. जेव्हा एका पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना त्यांचे शिक्षण आणि वैद्यकीय पदवी याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यास सुरवात केली. परंतु नंतर त्यांनी केलेले खुलासे धक्कादायक होते कारण गेल्या पाच वर्षांपासून ते स्वत:चे दवाखाने चालवत आहेत आणि निरपराध लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.

सर्वात सक्षम डॉक्टर फक्त १२वी पास

बनावट डॉक्टर म्हणजे कमरुद्दीन जो की १२वी पास आहे. यानंतर मुकुल अमर ज्याने फक्त ११वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. याशिवाय किस्मत अन्सारी ८वी पास, तय्यब चौधरी ६वी पास आणि मकसूद अन्सारी ५वी यांना या फसवणूकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यापैकी कोणत्याही आरोपीजवळ प्रॅक्टिस साठी आवश्यक असणारे कागदपत्रे आणि संबंधित डिग्री मिळालेली नाही.

वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले की, हे लोक कोणत्याही दवाखान्यामध्ये वॉर्ड बॉय आणि सहाय्यक म्हणून काम करण्याच्या लायकीचे देखील नाहीत, डॉक्टर बनून दवाखाना चालविणे तर फार दूरची गोष्ट आहे. ते म्हणाले की बरेच लोक त्यांच्याकडे वैद्यकीय सल्लामसलत करण्यासाठी येत असतात ज्यात मुले आणि वृद्ध लोक यांचाही समावेश आहे. सर्व आरोपींना अटक करून शिवाजी नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. १० फेब्रुवारी पर्यंत आरोपींना कस्टडीमध्ये ठेवण्यात येईल.

अशा बनावट डॉक्टरांविरोधात मुंबई पोलिसांनी मोहीम राबविली असून गेल्या १० महिन्यांत अशा १९ बनावट डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

You might also like