नवी मुंबई पोलिसांकडून नगर जिल्हयातील तिघांना अटक, 64 रॉयल एनफिल्ड बुलेट जप्त

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  नवी मुंबई क्राईम ब्रँचने नगर जिल्ह्यातील तिघांना अटक केली. त्‍यांच्याकडून तब्‍बल ६४ बुलेट जप्त केल्या आहेत. (Mumbai Crime Branch seized 64 Royal Enfield Bullet) ही कारवाई युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या पथकाने केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा, महाराष्ट्र राज्यातील १६ तालुक्यांमधून या बुलेट गेल्या सहा महिन्यात चोरी करण्यात आल्या होत्या. एमएमआरडीए क्षेत्रातील मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून २७ बुलेट तर नगरमधील जामखेड येथून ३०, गोवा दोन आणि उर्वरित पुणे, बीड, अकलूज, उस्मानाबाद जिल्ह्यातून बुलेट हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली. दरम्यान, मुंबई क्राईम ब्रँचने नगर जिल्‍ह्यातील तिघांना दुचाकी चोरी प्रकरणी (three thieves arrested) अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी तब्‍बल ६४ बुलेट जप्त केल्‍या आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपी अमोल शिवाजी ढोबळे, सोहेल शेख, सौरभ कंरजे यांना अटक करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त गुन्हे बी. जी. शेखर आणि डीसीपी क्राईम प्रवीण पाटील यांनी सांगितले.