Mumbai : पोटात लपवले 2.5 किलो कोकेन, शस्त्रक्रिया करुन काढले बाहेर; 13.35 कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परदेशातून पोटात लपवून आणलेले कोकेन महसूल संचालनालयाच्या गुप्त वार्ता विभागाने (DRA) जप्त केले आहे. याप्रकरणी टांझानियाच्या दोन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सापळा रचून करण्यात आली आहे. आरोपींनी पोटात लपवून कोकेन आणले असल्याची माहीती डीआरएला मिळाली होती. त्यानुसर दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन पोटातून कोकेनच्या 2.22 किलोच्या 151 गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. या कोकोनचे बाजारमुल्य 13 कोटी 35 लाख रुपये आहे.

डीआरएने अटक केलेले दोन्ही परदेशी नागरिक टांझानिया देशाचे नागरिक आहे. मतवाजी कार्लोस अँडम आणि रशीद पौला सायला अशी त्यांची नावे असून, जे जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन त्यांच्या पोटात लपवलेले ड्रग्ज बाहेर काढून जप्त करण्यात आले. चौकशीमध्ये हे आरोपी वैद्यकीय व्हिसावर भारतात आले होते.

आरोपींनी भारतात कोकेन आणण्यासाठी वैद्यकिय व्हिसा मिळवला होता. कोकेनच्या गोळ्या पोटात ठेवल्येला दोन आरोपींनी 22 एप्रिलला टांझानियाहून मुंबईत आगमन केले होते. त्यांच्या संशयास्पद हालचालीमुळे डीआरएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी सुरु असताना आरोपींनी पोटात दुखत असल्याचा बहाणा केला. त्यामुळे संशय बळावल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना जे जे रुग्णालयात नेले. त्याठिकाणी दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पोटातून लपलेल्या कोकेनच्या 151 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.