Mumbai Crime | धक्कादायक ! एका शुल्लक कारणावरून डिलिव्हरी बॉयची निर्घृणपणे हत्या

0
102
Mumbai Crime | delivery boy mumbai crime killing of delivery boy over petty reason incident caught on cctv
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Mumbai Crime | मुंबईतील मीरा रोड पूर्वेकडील शांती पार्क संकुलातील जांगीड शार्कल या ठिकाणी एका तरुणाची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. अंकुश राज असे हत्या (Mumbai Crime) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो 21 वर्षांचा आहे. ही घटना काल रात्री घडली आहे. या हत्येप्रकरणी काशीमीरा गुन्हे शाखेने 5 जणांना अटक केली आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण?
मृत अंकुश हा एका ई-शॉपिंग कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. आपसातील वादामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ज्यावेळी अंकुशची हत्या करण्यात आली त्यावेळेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये काही लोक अंकुशला मारहाण करताना दिसत आहेत. या मारहाणीमध्ये अंकुश मोठ्या प्रमाणात जखमी झाला.

 

यानंतर त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता.
अंकुशचे काही दिवसांपूर्वी काही जणांशी भांडण झाले होते. त्या घटनेचा हत्येशी काही संबंध आहे का,
याचा तपास मीरा रोड पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 

Web Title :-  Mumbai Crime | delivery boy mumbai crime killing of delivery boy over petty reason incident caught on cctv

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anil Parab | ‘नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलवा..;’ म्हणत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले म्हाडाच्या सीईओला फैलावर

Pune Crime News | भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या डोक्यात घातला दगड, तीन जणांवर FIR; कोथरुडमधील घटना

Chandrasekhar Bawankule | ‘मोदी-शहांबद्दलचे प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण;’ चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांची भली मोठी यादी; काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढणार