Mumbai Crime | महिलेने पोटात लपवल्या ड्रग्जनं भरलेल्या तब्बल 20 कॅप्सूल, पोलिसही चक्रावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | ड्रग्जची तस्करी (Drug Smuggling) करण्यासाठी तस्कर कोणत्या युक्त्या वापरतील याचा नेम नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) दुबई (Dubai) येथून आलेल्या एका महिलेकडून लाखो रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (Directorate of Revenue Intelligence) अधिकाऱ्यांना या महिलेचा संशय आल्याने तिची चौकशी (Mumbai Crime)  केली. चौकशी दरम्यान महिलेकडून तब्बल 10 लाखाचे ड्रग्ज सापडले. महिलेने हे ड्रग्ज तिच्या पोटात (Stomach) लपवून आणले होते. पोलिसांनी महिलेच्या पोटातून तब्बल 10 लाखाचे 214 ग्रॅम हेरॉईन ड्रग्ज (Heroin Drugs) जप्त केले.

 

परदेशातून येणारी एक महिला तिच्यासोबत ड्रग्ज घेऊन आल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळाली होती. त्यानंतर दुबई येथून आलेल्या महिलेला थांबवून तिच्या बॅगेची झडती घेतली. परंतु अधिकाऱ्यांना त्यातून काहीच मिळाले नाही. त्यानंतर तिच्या शरिराची तपासणी केली असता तिच्या पोटात एकूण 20 कॅप्सूल सापडल्या. डीआरआयनं (DRI) त्या कॅप्सूलची तपासणी केली असता, त्यामध्ये हेरॉईन आढळून आले. (Mumbai Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिलेला अटक (Arrest) करण्यात आली असून, तिच्या पोटातून कॅप्सूल जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. महिलेने हे ड्रग्ज कुठून आणले ? कोणाला देणार होती ? याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच तिच्या पोटात ड्रग्जने भरलेल्या कॅप्सूल टाकण्यासाठी तिची कोणी मदत केली ? याचा देखील पोलीस तपास करत आहेत. याशिवाय महिलेच्या फोनची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.

 

Web Title :- Mumbai Crime | drugs worth 10 lakh found in stomach of woman who came from dubai to mumbai dri arrested after investigation at mumbai international airport

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा