Mumbai Crime | प्रसिद्ध बालरोगतज्ञाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Mumbai Crime | जॅक अँड जिल रुग्णालयाचे बालरोगतज्ञ (Pediatrician) डाॅक्टर प्रेम पहुजा (Dr. Prem Pahuja) यांनी राहत्या घरात आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक (Mumbai Crime) माहिती समोर आली आहे. पहुजा यांनी घरातील गॅलरीच्या अँगलला ओढणीने गळफास घेतला आहे. दुपारी एकच्या सुमारास रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टर प्रेम यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. अनेक वेळ डाॅ. पहुजा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पोलिसांनी (Police) त्यांच्या घरात प्रवेश केल्याने पहुजा गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

याबाबत माहिती अशी की, नवी मुंबईत सानपाडा परिसरातील जॅक अँड जिल रुग्णालयाचे (Jack & Jill Hospital) बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रेम पहूजा यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट न सापडल्याने मृत्यचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सानपाडा पोलिसांनी (Sanpada police) त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस (Mumbai Crime) करीत आहेत.

 

Web Title : Mumbai Crime | famous pediatrician dr prem pahuja commits suicide at his residence

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

आता मोबाइल नंबर रजिस्टर न करता डाऊनलोड करू शकता Aadhaar Card, खुप सोपी आहे पद्धत

Gold Price Today | सोने पुन्हा ‘स्वस्त’ ! सर्वोच्च स्तरापासून 10799 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

PM Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील 12000 रुपये, परंतु यांना मिळणार नाही फायदा

PMPML | एमएनजीएल आणि पीएमपी अधिकाऱ्यामध्ये 52 कोटींच्या थकबाकी बाबत उद्या बैठक