Mumbai Crime | मुंबईच्या झवेरी बाजारात GST विभागाची मोठी कारवाई ! भिंतीत सापडले कोट्यावधीचे घबाड; 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | मुंबईच्या झव्हेरी बाजारातील (Mumbai Zaveri Bazaar) मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची (Chamunda Bullion Company) उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पद वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या (State GST Department) विश्लेषणात लक्षात आले. यानंतर जीएसटी विभागाने (Mumbai Crime) टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. तसेच भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड (Cash) आणि 13 लाख रुपये किंमतीच्या 19 किलो चांदीच्या विटा (Silver Bricks) आढळून आल्या.

 

कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 13 लाख रुपये किंमतीच्या 19 किलोच्या चांदीच्या विटा आढळून आल्या. राज्य जीएसटी विभागाने सदर जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही (Income Tax Department) या घटनेची माहिती देण्यात (Mumbai Crime) आली आहे. या कारवाईमुळे झवेरी बाजारात खळबळ उडाली आहे

प्राप्तिकर विभागाने ही रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे.
राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी (GST Theft) शोधणे आणि
कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी  शोधण्यात यश मिळविले आहे.
राज्य कर विभागाचे सहआयुक्त राहूल द्विवेदी (State Tax Department, Joint Commissioner, Rahul Dwivedi),
उपायुक्त विनोद देसाई (Deputy Commissioner Vinod Desai) यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे राज्य कर विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title : Mumbai Crime | Income Tax department Maharashtra State GST (Goods & Services Tax) seized cash worth Rs 9.78 crore and 19 kg of silver hidden in floor and wall cavities from the office of a bullion trader in Zaveri Bazar, Mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा