Mumbai Crime | चक्क मुलानेच बाप्पाला लुटले; गळ्यातील हार चोरुन झाला पसार

मीरा रोड : Mumbai Crime | घरोघरी गणरायांचे (Ganesh Utsav) आगमन झाले असता घरातील गणपतीला घातलेला सोन्याचा हार (Gold Jewellery) चक्क मुलाने चोरुन नेण्याचा प्रकार मीरा रोड (Meera Road) परिसरात घडला आहे. (Mumbai Crime)

या प्रकरणी मालन इंगवले Malan Ingwale (वय ६४, रा. मीरा रोड, पूर्व) यांनी नया नगर पोलीस ठाण्यात (Naya Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६५६/२२) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालन इंगवले (वय ६४) या आपले पती शंकर व मुलगी दीपाली यांच्यासह शांतीनगरमध्ये राहतात. त्यांचा मुलगा विशाल (वय ३९) हा पेणकर पाडा येथे रहात असून तो खासगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. (Mumbai Crime)

इंगवले यांच्या घरी गणपती बसल्यापासून विशाल हा घरी ये जा करीत होता.
मालन इंगवले यांनी ४ सप्टेबर रोजी विशाल याला जेवण देऊन त्या बहिणीकडे गेल्या.
त्यांचे पती झोपले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या.
तेव्हा विशाल घरात नव्हता. गणपतीच्या गळ्यातील सोन्याचा हारही त्यांना दिसून आला नाही.
त्यांनी घरात सर्वत्र शोधल्यानंतरही हार मिळाला नाही.
त्यांनी विशाल याला फोन केला तर त्याचा मोबाईल बंद लागत होता.
त्यामुळे त्यांनी विशाल यानेच गणपतीच्या गळ्यातील ४ तोळे वजनाचा सोन्याचा हार चोरुन नेल्याची फिर्याद पोलिसांकडे केली आहे.

Web Title :- Mumbai Crime | It was the boy who robbed Bappa; The necklace was stolen and passed away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती

Cardiac Arrest | माता पार्वती बनून नाचणार्‍या व्यक्तीला आला हार्ट अटॅक… स्टेजवरच मृत्यू, Video

Mumbai Pune Expressway | जीव वाचवण्यासाठी कंटेनरमधून मारली उडी, पण…; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात