Mumbai Crime | मुंबईतील जोगेश्वरीमधून एक दहशतवादी अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | दिल्ली पोलिसांच्या (Delhi) विशेष पथकाने गेल्या आठवड्यात मुंबईसह देशभरातून सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. महाराष्ट्रासह 6 राज्यात साखळी बॉम्बस्फोट (serial bomb blast) घडवून आणण्याचा कट रचला होता. यामध्ये मुंबईतील सायन (Sion) भागात (Mumbai Crime)राहाणाऱ्या जान मंहम्मद या दहशतवाद्याचा समावेश होता. त्यानंतर आता महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) आणि मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या (Mumbai Police Crime Branch) पथकाने मध्यरात्री जोगेश्वरी (jogeshwari) येथूनही इजा संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. जाकीर असं त्याच नाव असून नागपाडा एटीएस (nagpada ats) कार्यालयात त्याची चौकशी केली त्यानंतर त्याला अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याचं वृत्त आहे.

महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात एकचवेळी कारवाई करत जान मोहम्मद शेखसह इतर पाच दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. मुंबईतील सायन भागातुन जान महंमदला अटक करण्यात आली. जान हा गेल्या २० वर्षांपासून दाऊद इब्राहिम (underworld don dawood ibrahim gang) टोळीशी संबंधित होता. सध्या तो अनिस इब्राहिमच्या संपर्कात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात उघडकीस आल्याने महाराष्ट्र एटीएसने गंभीर दखल घेत आता त्यांचा स्वतंत्र तपास सुरू केला होता. त्यातच आता जोगेश्वरी येथून आणखी एका जाकीर या दहशतवाद्याला अटक केली आहे. जान आणि जाकीर यांच्यात काही कनेक्शन आहे का? याचा तपास सुरु केला असल्याचे वृत्त आहे.

Web Titel :- Mumbai Crime | maharashtra ats and mumbai police crime branch has taken a person into custody from jogeshwari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘मॉर्निग वॉक’ला गेल्यानंतर चोरट्यांनी फोडले ‘घर’ ! चोरट्यांचा शहरात वाढला उच्छाद, अवघ्या पाऊण तासात चोरी

Pune Crime | पत्नीचे मेव्हण्याबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पत्नीच्या अंगावर ओतले मटणाचे ‘कालवण’; इंदापूरमधील घटना

Pune Crime | जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्याऐवजी पळविला मोबाईल