Mumbai Crime | धक्कादायक ! रेल्वेत महिलांच्या डब्यात नराधमाचे चक्क ‘हस्तमैथुन’ अन् ‘अश्लिल’ चाळे, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Mumbai Crime | महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या एका पुरुषाने भरदिवसा हस्तमैथुन (masturbating) अन् अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर रेल्वे प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून मुंबईतील (Mumbai Crime) लोकलमधील महिला सुरक्षीत आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे महिला प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या विकृतावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र व्हिडिओ पाहिल्यावर हा व्हिडिओ सध्याचा (Latest viral video) असल्याचे समजते.
कारण या व्हिडिओमध्ये अनेक महिलांनी चेहऱ्यावर मास्क (Mask) घातल्याचे पहायला मिळत आहे.

 

व्हिडिओमध्ये एक पुरुष लोकलच्या दारात उभा असून तो हस्तमैथुन (masturbating) करताना दिसत आहे आणि महिला घाबरलेल्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
महिला त्याला विरोध करत आहेत. मात्र, त्याने महिलांचा विरोध न जुमानता हस्तमैथुन करण थांबवले नाही.
या विकृत पुरुषाच्या चेहऱ्यावर आपण काही चुकीचं करत असल्याचा कोणताही भाव दिसत नाही. व्हायरल झालेला हा व्हिडिओ 21 सेकंदाचा आहे.

 

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (Railway police) याची दखल (Mumbai Crime) घेतली आहे.
आम्ही आरोपीचा तपास (Mumbai Crime) करत असून लवकरच त्याला अटक (Arrest) केली जाईल, आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करु असे आश्वासन रेल्वे पोलिसांनी दिले आहे.

 

Web Title : Mumbai Crime | mens masturbating womens coaches train video viral railway police took notice mumbai crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे यांच्यासह चौघांना अटक

Pune News | राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी निधी मंजूर – हेमंत रासने

Nawab Malik | दाऊदची जमीन सनातन संस्थेनं खरेदी केली?; नवाब मलिकांच्या आरोपावरून सनातन संस्थेचं प्रत्युत्तर, म्हणाले…