Mumbai Crime | खारमध्ये डिलिव्हरी बॉयने घरात घुसत केला महिलेचा विनयभंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खारमध्ये एका खासगी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसत एका महिलेचा विनयभंग (Mumbai Crime) झाल्याची घटना घडली आहे. खार भागात राहणाऱ्या एका महिलेने ‘झेप्टो’ नावाच्या वेबसाइटवरून केलेली ऑर्डर पोहोचविण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने या महिलेचा विनयभंग (Mumbai Crime) केला. याप्रसंगी सुरक्षारक्षकाने मदत केल्याने बचावल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे.

 

पीडित महिलेने झाल्या प्रकाराची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. महिले म्हणते, ‘मी 30 नोव्हेंबर रोजी झेप्टो येथून घरगुती सामानाची ऑर्डर केली होती. दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी डिलिव्हरी बॉय शहजाद शेख ऑर्डर देण्यासाठी आला. मी गुगल पेवरून त्याला पैसे पाठवत होते. तेव्हा तो लपून माझा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. मला त्याचा संशय आल्यावर मी याबाबत त्याला विचारले. तेव्हा त्याने मला उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर मी त्याच्याकडे त्याचा मोबाइल मागितला. 15 मिनिटे त्याने मोबाइल दाखवला नाही. अखेर मी त्याला मोबाइल दाखव, अन्यथा सुरक्षारक्षकाला बोलावेन असे सांगितले. मी सुरक्षारक्षकाला बोलावण्याची धमकी दिल्यावर तो जबरदस्तीने माझ्या घरात शिरला आणि माझ्या अंगाला स्पर्श (Mumbai Crime) करू लागला. त्याने माझे हात पकडले आणि माझ्याशी गैरवर्तन करू लागला. मला खूप मोठा धक्का बसला आणि मी किचनमध्ये पळाले. किचनच्या खिडकीतून मी सुरक्षारक्षकाला हाक मारली आणि त्यावेळी सुरक्षारक्षक तिथे आला आणि मी बचावले.

सुरक्षारक्षक आल्यावरदेखील तो ऐकत नव्हता. तो माझ्या अंगावर येण्यासाठी धावत होता.
अखेर सुरक्षारक्षकाने त्याला अडवले आणि त्याचा फोन माझ्याकडे दिला.
त्याच्या मोबाइलमध्ये माझा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ होता, असे पीडित महिलेने सांगितले आहे.

 

सुरक्षारक्षक वेळीच पोहोचला नसता, तर मोठा प्रसंग ओढवला असता.
त्यामुळे महिला सुरक्षा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलीस झेप्टो नावाच्या वेबसाइटशी संपर्क करून पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Mumbai Crime | molestation of women in west khar mumbai by zepto delivery boy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jitendra Awhad | ‘मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच उभा राहतो, म्हणजे पोलीस पाकीटमारीचा गुन्हा दाखल करतील’ – जितेंद्र आव्हाड

Live In Relationship Rules In India | जाणून घ्या लिव्ह इन नात्याबद्दल भारतीय कायदे काय म्हणतात

Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा