Mumbai Crime | पुणे ग्रामीणच्या दौंडमधील DySp नं छेडछाड केल्याचा आरोप ! वकिल महिलेचा मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | पुणे जिल्ह्यातील (Pune district) दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांनी (Daund SDPO) आपल्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप करत पुण्यातील एका महिला वकिलाने (lady lawyer) मुंबईतील (Mumbai Crime) मंत्रालयाबाहेर (mantralaya) आत्महत्येचा प्रयत्न (attempt Suicide) केल्याची खळबजनक घटना घडली आहे. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. महिलेच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

पुणे जिल्ह्यातील दौंड येथील वकील महिलेने मुंबईतील (Mumbai Crime) मंत्रालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दौंडचे पोलीस उपअधीक्षक (DySp) यांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा दावा महिला वकिलाने केला आहे. पोलीस अधिकाऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करुन देखील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जात नाही. त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांकडे दाद मागितली तरी देखील न्याय मिळत नसल्याने तिने टोकोचं पाऊल उचललं, अशी माहिती मिळत आहे.

 

महिलेने मंत्रालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न करत असताना वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी (Marine Drive police)
महिलेला ताब्यात घेतले असून या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) म्हणाले, या महिलेने पोलीस उपअधीक्षक यांच्या केबीनमध्ये गोंधळ घातला होता.

त्यावेळी तिच्या सोबत असलेल्या ‘भगोडा’ घोषीत केलेल्या भारतीय सैन्य दलातील एकाला अटक केली होती. तर महिलेवर IPC 353  गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात कारवाई होऊ नये यासाठी महिलेकडून अशा प्रकारचे कृत्य केले जात आहे.

 

Web Title :- Mumbai Crime | Mumbai crime pune rural police daund lady lawyer accuses daund dysp sdpo molested attempts suicide outside mantralaya in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा