Mumbai crime | BMC चा अधिकारी असल्याचा आव आणत लाच मागणाऱ्याने केला चोरीचा प्रयत्न; मुंबई पोलिसांनी केली अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्वतः बीएमसी अधिकारी असल्याची बतावणी करत लाच मागणाऱ्या आणि ती न मिळाल्यानंतर गळ्यातील चैन चोरी (Mumbai Crime) करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत चोराला पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय बाबूराव धोत्रे (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ओशिवारी (Mumbai Crime) पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आरोपी अक्षय बाबू धोत्रे (Akshay Babu Dhotre), राहणार खारदांडा याने बीएमसी अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादी मंजू राकेश जैन (वय 63 वर्ष) यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या घरात चाललेले नूतनीकरणाचे काम बेकायदा असल्याचे म्हणाला. हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांच्याकडून 10 हजारांची लाच मागितली. 11 नोव्हेंबर रोजीची ही घटना आहे.

 

फिर्यादी घरी असताना अक्षय धोत्रे (Mumbai Crime) हा त्याच्या घरी बीएमसीच्या ईस्ट वार्ड अंधेरी पश्चिम मेंटेनन्स विभागाचा अधिकारी म्हणून आला.
त्याच्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर पद्धतीने नूतनीकरणाचे काम चालू असल्याची माहिती त्याला मिळाल्याने तो आला आहे,
असे तो फिर्यादीला म्हणाला. या बेकायदेशीर कामावर कारवाई न करण्यासाठी आरोपीने फिर्यादीकडून दहा हजार रुपयाची मागणी केली.
पण फिर्यादीने कसले ही पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी अक्षय याने फिर्यादीना धक्का देऊन जबरदस्तीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून घेण्याचा प्रयत्न केला.
पण त्या ठिकाणी मंजू जैन यांचा घरगडी त्यांच्या मदतीला आल्याने आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला.

फिर्यादी मंजू राकेश जैन (Manju Rakesh Jain) (रा. फ्लॅट नंबर 701, ए विंग, आयर्लंड पार्क सोसायटी,
लोखंडवाला, अंधेरी पश्चिम) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ओशिवरा पोलीसांनी आयपीसी (IPC) कलम 393, 170, 420 प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Mumbai Crime | mumbai police crime news bogus bmc officer demanded a bribe of 10000 then attempted theft case was registered against accused

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत