Mumbai Crime News | मुंबईतील आयआयटीमध्ये 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Mumbai Crime News | मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पवई आयआयटीमध्ये एका विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. दर्शन सोलंकी (वय 19) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मूळचा हैद्राबादचा रहिवाशी असून तो तीन महिन्यापूर्वीच आयआयटीचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आला होता. शनिवारी त्याची परीक्षा झाली आणि काल त्याने हे टोकाचे पाऊल उचलले या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत दर्शन आयआयटीमध्ये बी. टेकच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो आयआयटीतील 16 नंबर वसतिगृहाच्या 802 खोलीत राहत होता. काल दुपारच्या सुमारास अचानक हॉस्टेलच्या परिसरात काही तरी पडल्याचा आवाज आल्याने एकच धावपळ उडाली. यानंतर हॉस्टेलमध्ये कर्मचाऱ्यांनी बघितल्यावर दर्शन हा होस्टेलच्या परिसरात रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दर्शनचा मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पवई पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दर्शन सोलंकी तीन महिन्यांपूर्वी हैद्राबादहून आयआयटी पवईत पुढील शिक्षण घेण्यासाठी आला होता. परंतु, दर्शनने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पवई पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. तसेच दर्शन सोलंकीने आत्महत्या करण्यापूर्वी हॉस्टेलच्या खोलीत भिंतीवर “माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये”, असा मेसेज लिहिला होता. या घटनेमुळे आयआयटी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime News)

मावसभावाला व्हिडिओ कॉल करत तरुणाची आत्महत्या
काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये अशीच एक घटना घडली होती.
यामध्ये मावसभावाला व्हिडिओ कॉल करत तरुणाने आत्महत्या केली आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी भागामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे.
अमोल उत्तम खाडे (वय-29, रा.शाहूनगर, मुकुंदवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

Web Title :-  Mumbai Crime News | 19 year old student has ended his life at iit powai mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा