Mumbai Crime News | बलात्कारातील आरोपी हातकडीसह पोलीस व्हॅनमधून पळाला; मुंबईतील सिग्नलवर घडला प्रकार

मुंबई (Mumbai Crime News ) : Mumbai Crime News |अल्पवयीन मुलीवर बलात्कार (rape) केल्याच्या आरोपावरुन अटक केलेल्या आरोपीला कोर्टात नेत असताना सिग्नलला थांबलेल्या पोलीस व्हॅनमधून (Police van) हातकडीस पलायन केले. कांदिवली येथील सिग्नलवर हा थरार घडला.

अविनाश यादव (Avinash Yadav) (वय २१, रा. राठी, लक्ष्मीनगर, चारकोप) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीचे एका १७ वर्षाच्या मुलीवर प्रेम होते. मात्र तिच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. याचदरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध (Physical contact) आले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी आरोपीविरुद्ध फिर्याद दिली.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याबद्दल चारकोप पोलिसांनी अविनाश यादव
(Avinash Yadav) याला अटक केली. २६ जून २०२१ रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. काल
सकाळी त्याला अँटीजन चाचणी ( Rapid Antigen Test ) करण्यासाठी नेण्यात आले होते.
तेथून परत येत असताना पोलीस व्हॅन (Police van) कांदिवली सिग्नलजवळ (Kandivali
signal) थांबली होती. गाडी थांबताच त्याने संधी साधून अचानक पोलिसांना धक्का देऊन तो पळून
गेला. त्याच्या उजव्या हातात हातकडी आहे. तिच्यासह तो पळून गेला असून चारकोप पोलीस (Charkop police) शोध घेत आहेत.

हे देखील वाचा

BJP MLA | रिसॉर्टवर जुगार खेळताना भाजप आमदारासह 13 जणांना रंगेहाथ पकडले; 7 तरुणींचा समावेश, दारूच्या बाटल्या आढळल्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Mumbai Crime News | A rape accused escaped from Police custody on Wednesday while the team was taking him to Court after his Rapid Antigen Test

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update