Mumbai Crime News | अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, धर्मेंद्रच्या निवासस्थानी बॉम्बस्फोटाची धमकी, आरोपीला पुण्यातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime News | नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला (Nagpur Police Control Room) फोन करुन उद्योगपती मुकेश अंबानी (Industrialist Mukesh Ambani), बीग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांची घरे बॉम्बने (bomb-blast) उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एकाला पुण्यातील लोणीकंद (Lonikand) येथून अटक (Arrest) केली आहे. राजेश कडके Rajesh Kadke (वय-20) असे अटक केलेल्या आरोपीचे (Mumbai Crime News) नाव असून तो दिव्यांग असल्याची माहिती मिळत आहे.

 

काय आहे प्रकरण?
मुकेश अंबानी, बीग बी अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते धमेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट होणार असल्याची खोटी माहिती नागपूर येथील हेल्पलाईन 112 क्रमांकाला दिल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) बुधवारी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. (Mumbai Crime News)

नागपूर 112 या हेल्पलाईनवर मंगळवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास राजेश कडके याने फोन केला होता. यावेळी त्याने मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) या मालिकेतील दिलीप जोशी (Dilip Joshi) यांच्या घरासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यामध्ये 25 जणांकडे बंदुका आणि बॉम्ब असून ते मुकेश अंबानी, अमताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घराजवळ स्फोट करुन शकतात असे सांगितले होते. त्यानंतर नागपूर पोलिसांनी याची माहिती मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला (Mumbai Police Control Room) दिली होती.

 

मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी फोन ट्रेस करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपीचे लोकेशन पुण्यात सापडले.
मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने लोणीकंद येथून आरोपी राजेश कडकेला अटक केली.

 

Web Title :- Mumbai Crime News | amitabh bachchan businessman mukesh ambani bomb threat disabled accused arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | चोरीला गेलेले दागिने महिलेला केले परत, कोंढवा पोलिसांची कामगिरी

Suspended PSI Arrested | विनयभंग प्रकरणातील फरार पोलीस उपनिरीक्षकाला अटक, एवढ्या दिवसांची पोलीस कोठडी

Pune Pimpri Chinchwad Crime | वाकडमध्ये कोयता गँगची दहशत, फिनिक्स मॉलमधील माथाडी कामगारांना मारहाण; 7 जणांवर FIR