Mumbai Crime News | होळी खेळून घरी गेलेल्या दिपक शाह आणि टिना शाह यांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट, मुंबईतील घाटकोपरमधील घटना

घाटकोपर : पोलीसनामा ऑनलाईन – Mumbai Crime News | मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपरमध्ये (Ghatkopar) चाळीशीतील दाम्पत्याचे त्यांच्या घराच्या बाथरुममध्ये मृतदेह आढळून आले आहेत. या दोन्ही मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे समजू शकलेले नाही. या दोघांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदचा अहवाल आल्यानंतरच यांचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होणार आहे. (Mumbai Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?

दिपक शाह (44) आणि टिना शाह (39) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. हे दाम्पत्य घाटकोपर पूर्वेतील पंत नगरमधील कुकरेजा पॅलेसमध्ये राहत होते. दिपक यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. या दाम्पत्याने मंगळवारी कुटुंबीय आणि शेजाऱ्यांसोबत होळी साजरी केली. त्यानंतर ते दोघे त्यांच्या घरी गेले अशी माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी दिपक आणि टिना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. यानंतर त्यांचे कुटुंबीय त्यांच्या घरी गेले. (Mumbai Crime News)

त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या चावीच्या सहाय्याने खोलीचे दार उघडले.
त्यावेळी त्यांना दिपक आणि टिना बाथरुममध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आले.
यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी याची माहिती तातडीने पंत नगर पोलिसांना दिली.
यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शाह दाम्पत्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले मात्र
त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या दोघांच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नसल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवीदत्त सावंत यांनी सांगितले आहे.
त्यामुळे या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलीस या प्रकरणाच्या पुढील तपासाला सुरुवात करणार आहेत.

Web Title : Mumbai Crime News | couple found dead in bathroom after playing holi in mumbai Ghatkopar rajawadi hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे