Mumbai Crime News | इन्स्टा मैत्री पडली महागात ! पोलिसात नोकरी देण्याच्या आमिषाने मित्राने महिलेला 2 लाखात विकले

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाईन – Mumbai Crime News | सोशल मीडियावर फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक फसवणुकीची घटना अर्नाळा या ठिकाणी उघडकीस आली आहे. पोलिसात नोकरी देण्याच्या आमिषाने एका इन्स्टा फ्रेंडने महिलेला चक्क औरंगाबादला नेऊन राजस्थानला 2 लाखात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणातून 27 वर्षीय पीडित महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही घटना अर्नाळा परिसरात घडली आहे. (Mumbai Crime News)

पीडित महिला ही अर्नाळा येथील रहिवासी आहे. सोशल मीडियावर कुठे पोलीस भरती किंवा ट्रेनिंग मिळते का याचा शोध घेत असतानाच तिची ओळख आरोपी दिनेश पुरी सोबत झाली. दिनेश पुरीने पीडितेला आर्मीचे त्याचबरोबर पोलीस ट्रेनिंगचे काही फोटोज देखील पाठवले होते. यानंतर त्यांच्यात बोलणे सुरू होते. काही दिवसांनी आरोपीने तिला औरंगाबाद येथे पोलीस भरतीची ट्रेनिंग सुरू आहे असे सांगून 11 जानेवारीला तिला औरंगाबादला बोलवून घेतले.

पीडित महिला औरंगाबाद येथे पोहोचल्यानंतर आरोपीने तिला राजस्थानच्या पोलिसात तुझे काम झाले आहे. असे सांगून तिला राजस्थानला पालनपुर येथे जाण्यास सांगितले. यानंतर पीडित राजस्थान ट्रेन पकडून पालंगपूर रेल्वे स्टेशनवर उतरली. यानंतर ती पालंगपूर बस डेपोतून भीमनाल या ठिकाणी पोहोचली असता तिला घेण्यासाठी त्या ठिकाणी चेतन भारती, भावेश पुरी, मसूर पुरी हे आले होते. यानंतर त्यांनी तिला चेतनच्या बहिणीच्या घरी नेऊन घुंगट घागरा घालून भीमराव कोर्टात १६ जानेवारीला लग्न लावले आणि एका कार मध्ये बसून तिला दोन दिवस फिरवत होते. त्यानंतर तिला पुन्हा चेतनच्या बहिणीच्या घरी घेऊन आले. (Mumbai Crime News)

यावेळी पीडितेने तिला इथे का आणल्याचे विचारल्यावर संपूर्ण गोष्टीचा उलगडा झाला.
तिला 2 लाखात विकले गेल्याचे समजले आणि चेतनने दिनेशला दोन लाख रुपये दिल्याचा स्क्रीन शॉट दाखवला.
यानंतर तिला चेतनच्या शिवानी बालोतरा गावी सोडण्यात आले.
काही काळाने तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला दवाखान्यातून पुन्हा घरी नेण्यात आले.
यावेळी पीडितेने युक्ती लढवत एका इसमाच्या मोबाईलवरून आपल्या बहिणीला फोन करून संपूर्ण घटना सांगितली.
यानंतर पीडितेच्या बहिणीने अर्नाळा पोलिसांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ राजस्थान गाठून पीडित महिलेची सुटका केली.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दिनेश पुरी, मसूर पुरी, भावेश पुरी आणि चेतन भारती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी चेतन भरतीला अटकही झाली आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास अर्नाळा पोलीस करीत आहेत.
अर्नाळा पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, पोलीस उपायुक्त सुहास बावचे,
सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अर्नाळा पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

Web Title :- Mumbai Crime News | Insta friendship is expensive! A friend sold the woman for 2 lakhs with the lure of a police job

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसब्यात हेमंत रासने तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप प्रचंड बहुमतांनी जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

Thane Crime News | ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा दिली म्हणून तरुणांवर गुन्हा दाखल, ठाण्यातील घटना