Mumbai Crime News | 100 रुपये परत न केल्याने मित्रानेच आवळला तरुणाचा गळा; मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून दिले पेटवून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दहिसर (Dahisar) येथे मामे भावाचे घेतलेले १०० रुपये परत न देता त्याला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून मित्रानेच तरुणाचा गळा आवळून खून (Mumbai Crime News) केला. त्यांनतर खून लपवण्यासाठी मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पेटवून देत आत्महत्येचा बनाव (Pretend To Commit Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार (Mumbai Crime News) उघडकीस आला आहे. राजू पाटील (Raju Patil) असे हत्या झाल्याचे नाव आहे तर याप्रकरणी परमेश्वर कोकाटे (Parmeshwar Kokate) याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजू पाटील आणि परमेश्वर कोकाटे यांची ८ वर्षांपासून मैत्री आहे. दोघेही एका गॅरेजमध्ये रहात होते. काही दिवसांपूर्वी राजू याने कोकाटे याच्या मामे भावाकडून १०० रुपये घेतले होते. ते परत मागितले असता राजुने शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरून कोकाटेने ४ फेब्रुवारीला रात्री साडे आठच्या सुमारास सोबत दारू प्यायल्यानंतर राजुचा प्लास्टिक दोरीने गळा आवळून हत्या (Murder In Dahisar) केली. त्यानंतर ही हत्या उघड होऊ नये म्हणून गॅरेजमधील काही कपड़े आणि ब्लकेटमध्ये राजुचा मृतदेह गुंडाळून रात्री उशिरा पेटवून दिला. दरम्यान, कोकटेने स्वतः आग आग म्हणत.. पाटीलने आत्महत्या केल्याचा आरडा ओरडा सुरु केला. स्थानिकांच्या लक्षात ही घटना (Mumbai Crime News) येताच ही आग विझवण्यात आली. तसेच पोलिसांना याची माहिती दिली.

 

 

पोलिसांनी (Dahisar Police) घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
तसेच घटनेची माहिती घेत असताना राजुने ब्लकेटमध्ये स्वतःला गुंडाळून घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
वास्तविक ब्लकेटमध्ये स्वतःला गुंडाळून कोणी आत्महत्या कसे करू शकतो? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला.
त्यामुळे पोलिसांना कोकाटेवर संशय आला. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच कोकटेने खुनाची कबुली (Confession of murder) दिली.
दरम्यान त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ५ दिवसांची कोठडी सुनावली असल्याची माहिती
दहिसर पोलीस ठाण्याचे (Dahisar Police Station) वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रवीण पाटील (Senior Police Inspector Praveen Patil) यांनी दिली.

 

Web Title :- Mumbai Crime News | making a suicide drama by killing a friend in a dispute of 100 rupees Dahisar Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा