Mumbai Crime News | शूटिंग बघण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला रात्रभर दुकानात डांबून लैंगिक अत्याचार; 21 वर्षीय नराधम अटकेत

Mumbai Crime News | Minor girl who went to watch shooting kept in shop overnight and sexually assaulted; 21-year-old man arrested

मुंबई : Mumbai Crime News | नदीच्या किनारी सुरू असलेले शूटिंग बघण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला रात्रभर दुकानात डांबून तिच्यावर दुकानदाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश म्हात्रे (वय-२१) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम गणेश म्हात्रे याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कल्याण जवळील आंबिवली परिसरात घडली. (Rape Case)

पोलिसात दाखल तक्रारीनुसार, आंबिवली स्टेशन परिसरात पीडित मुलीचे कुटुंब रहाते. तिचे आई वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी मैत्रिणीकडे जाऊन येते सांगून घरातून निघाली. परंतु खूप वेळ झाला तरी ती परत न आल्याने आई वडिलांनी तिचा शोध घेतला मात्र ती दिसून आली नाही. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ही मुलगी त्याच परिसरात आढळून आली. विश्वासात घेऊन तिच्या कुटुंबीयांनी विचारपूस केली असता तिने तिच्यासोबत रात्रभर घडलेला प्रसंग सांगितला.

आंबिवली येथील काळू नदी किनारी शूटिंग सुरू होती. ही शूटिंग पाहण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी त्या ठिकाणी गेली होती. याच परिसरातच गणेश म्हात्रे याचे किराणा मालाचे दुकान आहे. गणेशने मुलीला दुकानात बोलावत तेथे थांबायला सांगितले. मुलीने त्याला नकार दिला असता त्याने जबरदस्ती तिला दुकानात खेचून दुकानाचे शटर बंद करून घेतले. आरडाओरडा केला तर तुला मारेल व तूझी बदनामी होईल, अशी धमकी त्याने मुलीला दिली. त्यानंतर त्याने तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts