Mumbai Crime News | मुंबई : विले पार्ले येथील नानावटी हॉस्पीटलच्या शेजारी मिरवणूक सुरू असताना इमारतीची बाल्कनी कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime News | विले पार्ले परिसरातील (Vile Parle) नानावटी हॉस्पीटलच्या (Nanavati Hospital) शेजारी मिरवणूक सुरू असताना एका दुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना झाली आहे. यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे (Two senior citizens die as balcony collapses in Vile Parle Mumbai). ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Mumbai Crime News)

 

 

रॉबिन रॉकी मिस्किटा (70) आणि प्रशिला रॉबिन मिस्किटा (65) अशी मृत्यमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, इमारतीच्या बाजूच्या रस्त्यावरून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक जात होते. मिरवणूकीमध्ये काहीजण संगीतावर ताल धरत होते. त्यावेळी इमारतीच बाल्कनीचा काही भाग अचानकपणे कोसळला. त्यामध्ये इमारतीच्या खाली उभ्या असलेले रॉबिन मिस्किटा आणि प्रशिला मिस्किटा हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

 

https://www.facebook.com/reel/942015187092882

 

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन दलाचे जवान, रूग्णवाहिका, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मदतकार्य केलं. मुंबईत कालपासूनच मान्सून सक्रिय झत्तला आहे. पावसाची संततधार सुरू असताना ही घटना घडली असल्याने परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

Web Title :  Mumbai Crime News | Mumbai: A balcony of a building collapsed near Nanavati Hospital in Vile Parle,
killing a husband and wife.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा