Mumbai Crime News | नूडल्सचं आमिष दाखवून शेजाऱ्याकडून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Mumbai Crime News| मुंबईमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Minor Girle Rape) केले आहेत. शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपीने तीन मुलींना नूडल्सचं आमीष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.(Mumbai Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरोपी व्यक्ती हा पीडित तरुणींच्या शेजारी राहतो. त्याने तीन मुलींना खाण्यापिण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी नेलं. तिन्ही मुली आरोपीच्या घरात पोहोचताच त्यानं दरवाजा बंद केला, जेणेकरून कोणतीही मुलगी घरातून पळून जाऊ नये.त्यानंतर त्याने तिन्ही मुलींवर अत्याचार केले. यानंतर या मुली जेव्हा आरोपीच्या घरून आपल्या घरी परतल्या तेव्हा त्यांनी घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला.

हा सगळा प्रकार ऐकून या मुलींच्या आईला मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने जे.जे. पोलीस ठाण्यात
जाऊन आरोपी नराधमांविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी
नराधमाला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराडे यांनी दिली आहे.

Web Title :- Mumbai Crime News | neighbor arrested for abusing three minor girls in south mumbai in police custody till 4 february

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MC Stan | बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन लवकरच अडकणार लग्नबंधनात

Nandurbar ACB Trap | वाळूचा ट्रक सोडण्यासाठी 70 हजार रुपये लाच घेताना मंडळ अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Hingoli Crime News | वडील रागावल्याने अल्‍पवयीन मुलाकडून जन्मादात्या बापाची हत्या