Mumbai Crime News | वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या, प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime News | गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम गिरप (Sr PI Dattaram Girap) यांच्या 24 वर्षीय मुलगी 5 मजली इमारतीच्या टेरेस वरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. नेहा दत्ताराम गिरप (Neha Dattaram Girap) असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime News)

 

याप्रकरणी नवघर पोलीसांनी (Navghar Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

 

मुलुंडच्या पूर्वेकडील नानेपाडा परीसरात नेहा ही आई वडिलांसोबत राहण्यास आहे. ती तणावात असल्याने तिच्यावर उपचार देखील सुरू होते अशी माहिती समोर येत आहे. ती उच्चशिक्षण घेत पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास इमारतीच्या टेरेस वरून उडी घेत तिने आत्महत्या केली. (Mumbai Crime News)

घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी तिला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच तिला मयत घोषित करण्यात आले आहे. या घटनेने गिरप कुटुंबियांना धक्का बसला आहे. घटना स्थळावरून सुसाईड नोट मिळाली नसल्याचे पोलीसांनी सांगितले.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मुलीने आत्महत्या केल्याने संपूर्ण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

 

Web Title :- Mumbai Crime News | Sr PI Dattaram Girap Daughter Neha Suicide Incident In Navghar Police Station Limits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nora Fatehi | नोरा फतेहीच्या आरोपांवर सुकेश चंद्रशेखरचा आणखी एक मोठा खुलासा; म्हणाला…

Aaditya Thackeray | दावोस दौऱ्याच्या खर्चावरुन आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप, म्हणाले-‘4 दिवसांसाठी 40 कोटी, शिंदेंनी मित्रपरिवारावर पैसा उडवला?’ (व्हिडिओ)

Prashant Damle | प्रशांत दामले यांना ‘दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट’चा अक्षय्य पुरस्कार जाहीर