Mumbai Crime News | मुंबईत थरार! कौटुंबिक वादातून शेजारी राहणाऱ्या 5 जणांवर चाकूने सपासप वार, 2 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime News | कौटुंबिक वादातून शेजारी राहणाऱ्यां लोकांवर चाकूने सपासप वार केल्याची घटना मुंबईत घडली आहे. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना मुंबईतील (Mumbai Crime News) ग्रँड रोडवरील पार्वती मेन्शन चाळीत (Parvati Mansion Chal, Grant Road) घडली आहे. घटनेची माहिती मिळताच डीबी मार्ग पोलीस ठाण्यातील (DB Marg Police Station) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका माथेफिरुला ताब्यात घेतले आहे. चेतन गाला (Chetan Gala) असं या आरोपीचे नाव असून त्याने किरकोळ कारणावरुन शेजारी राहणाऱ्या लोकांवर चाकूने हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन गाला आणि शेजारी राहणाऱ्या लोकांसोबत किरकोळ वाद झाले होते. शाब्दीक वाद झाल्यानंतर आरोपी चेतन याने घरातून चाकू आणला आणि पाच जणांवर सपासप वार केले. आरडाओरडा झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघांवर उपचार सुरु आहेत. (Mumbai Crime News)

दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी चेतनला अटक केली. आरोपी चेतन हा मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात (Mental Stress) असल्याची माहिती आहे. कुटुंब त्याला सोडून गेल्याने त्याचा राग त्याच्या मनात होता. त्यासाठी तो शेजारी राहणाऱ्या लोकांना जबाबदार धरत होता. त्यातच शेजाऱ्यांसोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून त्याने पाच जणांवर चाकूने सपासप वार केले. यामध्ये जयेंद्र आणि निला मेस्त्री यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चेतन याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Web Title :- Mumbai Crime News | two people died after being stabbed by
neighbor in grand road mumbai today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Osmanabad ACB Trap |  कारवाईची धमकी देत वाळू ठेकेदाराकडून 70 हजार रुपये लाच
घेताना पोलीस पाटील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Social Welfare Department – Dhangar Samaj | धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना
इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis | मेडीगट्टा प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची कार्यवाही सुरु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Accident On Old Mumbai-Pune Highway | जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात
कमी करण्यासाठी, वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस