Mumbai Police Property Cell । विविध चोरीच्या घटनांमध्ये मुंबईतील महिलेलाआतापर्यंत 50 वेळा अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Police Property Cell ।अडीच हजार डॉलर्स चोरीच्या प्रकरणावरून मुंबईतील एका महिलेला मुंबई पोलीस प्रॉपर्टी सेलने (Mumbai Police Property Cell ) अटक केली आहे. मात्र, या अटक केल्यानंतर 2006 पासून तब्बल 50 वेळा या महिलेला विविध चोरीच्या प्रकरणामध्ये अटक झाल्याचे समोर आले आहे.यावरून पोलिसांनाही एक आश्चर्याचा धक्का बसला आहे. ती प्रत्येक वेळी नाव बदलून काम शोधते असेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. वनिता गायकवाड असे त्या अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. फॅशन डिझायनर असलेल्या दीपिका गांगुली यांच्या घरात झालेल्या चोरीच्या प्रकरणावरून त्या महिलेला अटक केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

अधिक माहितीनुसार, तेथील फॅशन डिझायनर (fashion designer ) असलेल्या दीपिका गांगुली (रा. विले पार्ले पश्चिम मुंबई) यांच्या घरात आरोपी वनिता गायकवाड या महिलेने घरकाम करण्याची नोकरी मिळवली. यादरम्यान दीपिका गांगुली (Deepika Ganguly) यांनी त्या महिलेकडे कागदपत्रांची मागणी केली.
परंतु, कागदपत्रे हरवली आहेत,
काही दिवसामध्ये जमा करते, असे त्या महिलेने म्हटलं होतं.
नंतर साधारण 10 दिवसांतच वनिता गायकवाड हिने रोख रक्कम चोरली आणि तेव्हापासून पसार झाली.
दीपिका गांगुली यांनी 26 मे रोजी घरात चोरी झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्या (Juhu Police Thane) त दिली होती.
तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान. सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) च्या साहाय्याने महिलेची ओळख पटवण्यात आली.
तसेच, गुन्ह्यांच्या नोंदींच्या आधारे तिला किती वेळा अशा प्रकरणात अटक (Arrest)  झाली असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.

दरम्यान, आरोपी महिलेला आतापर्यंत 50 वेळा अटक करण्यात आलेली आहे. तर तिला अनेकवेळा दोषीही ठरवलं गेलं आहे, पकडले जाऊ नये म्हणून ही महिला प्रत्येकवेळी नाव बदलते. असं प्रॉपर्टी सेलमधील वरिष्ठ पीआय शशिकांत पवार (Property Cell PI Shashikant Pawar)  यांनी सांगितलं आहे. तसेच, वनिता गायकवाड हिला विक्रोळी येथे अटक करण्यात असून, तिला दोन मुलं आहेत. तिची दोन्ही मुलं वेगळी राहतात, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : mumbai crime news woman arrested domestic help house theft property cell of the crime branch