Mumbai Crime | राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागणारी टोळी गजाआड ! मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याला अटक; अभिनेत्रीला नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावनं खंडणी मागण्याचा प्रकार मुंबईत (Mumbai Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईतल्या (Mumbai Crime) मालवणी पोलिसांनी (Malvani police) खंडणी (extortion) मागणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्यांमध्ये मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक (Marathi film director) निर्माते (producer) आणि त्यांच्या चालकाचा समावेश आहे. या घटनेच्या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिग्दर्शक मिलन वर्मा (Milan Verma), निर्माता युवराज बोराडे (Yuvraj Borade) आणि चालक सागर सोलंकर (Sagar Solankar) यांचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी एका मराठी अभिनेत्रिला (actress) देखील नोटीस बजावली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याचे बोललं जात आहे. आरोपींनी मढ परिसरातील एका बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला (Security guard) मारहाण केली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केला. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. एका वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

Aryan Khan Drug Case | आर्यन खानचे NCB ला वचन; म्हणाला – ‘मी एक जबाबदार नागरिक बनणार’

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करताना दिसत आहे. मारहाण करत असताना ती त्याला राजसाहेबांना ओळखत नाहीस का ? तूला मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही ? काम कोणासाठी करतोस ? असे अनेक प्रश्नही विचारताना दिसत आहे.
ही महिला आपल्या सहकाऱ्यांसोबत मढ येथील एका बंगल्यावर गेली होती.
त्यावेळी संभाषणा दरम्यान सुरक्षारक्षकाने राज ठाकरेंना ओळख नसल्याचे म्हटले होते.
यानंतर करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मालवणी पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींनी मढ मधील एका बंगल्यात जाऊन तेथील सुरक्षारक्षकाला मारहाण केली.
तसेच त्या सुरक्षारक्षकाकडे पैशांचीही मागणी केली होती.
एवढचं नाहीतर या आरोपींनी सुरक्षारक्षकाला मारहाण केल्यानंतर या घटनेचा व्हिडिओही व्हायरल केला होता.
या घटनेनंतर पीडित सुरक्षारक्षकाने पोलिसांकडे धाव घेतली. दयानंद गोड असे या सुरक्षारक्षकाचं नव आहे. सुरक्षारक्षकाने तक्रार केल्यानंतर आरोपींविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात (Malvani police station) आयपीसी कलम 452,385,323,504,506,34 अंतर्गत गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक केली.
तसेच एका महिलेला नोटीस पाठवण्यात आली होती, परंतु ती चैकशीसाठी उपस्थित राहिली नसल्याने पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’; ‘बेनामी’चा होणार पर्दाफाश

Mohan Bhagwat | ‘370 कलम रद्द केल्यानंतरही जम्मू काश्मीरमधील समस्येचं पूर्णपणे निराकरण नाही’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mumbai Crime | ransom in name of mns raj thackeray demanding gang arrested in mumbai marathi film director producer arrested notice to marathi actress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update