Mumbai Crime | गुंतवणुकीच्या नावाखाली बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला सव्वा चार कोटींचा गंडा

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | गुंतवणुकीच्या (Investment) नावाखाली बॉलिवूडच्या (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्रीला (Actress) सव्वा चार कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रिमी सेन (Rimi Sen) असे या अभिनेत्रीचे नाव आहे. तिने याप्रकरणी खार पोलिसांकडे (Khar Police) तक्रार (Mumbai Crime) दिली आहे. या प्रकारामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोरेगावमधील (Goregaon) व्यावसायिक रौनक जतीन व्यास (Raunak Jatin Vyas) याने गुंतवणुकीच्या नावाखाली रिमी सेन या अभिनेत्रीकडून 4.14 कोटी रुपये घेऊन फसवणूक (Cheating) केली. त्याप्रकरणी तिने खार पोलीस ठाण्यात (Khar Police Station) तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी आयपीसी (IPC) कलम 420 आणि 409 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. (Mumbai Crime)

 

विनोदी चित्रपटांमुळे (Comedy Movies) रिमी सेन ओळखले जाते. तिने हंगामा (Hungama), धूम (Dhoom), बागबान (Baghban), गोलमाल सारख्या (Golmaal) चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.
फिट बॉडी आणि तिच्या सौंदर्यामुळे ती खूप प्रसिद्ध होती. अनेक हिट चित्रपटात तिने भूमिका बजावूनही बॉलिवूडला तिने रामराम ठोकला.
याला दहा वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या मागील कारणही रिमी सेनने एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.
चित्रपटांमध्ये ग्लॅमरस प्रॉपची भूमिका करणे खूपच कंटाळवाणे होते. सातत्याने ही भूमिका करुन थकले होते, असे ती म्हणाली होती.
त्या काळी, संपूर्ण इंडस्ट्री मेल डॉमिनेटिंग होती.
सहाय्यक भूमिकेत अभिनेत्री असायच्या त्यामुळे एक सारख्या भूमिका करण्यापेक्षा इंडस्ट्री सोडणे मला योग्य वाटले असेही तिने सांगितले होते.

 

Web Title :- Mumbai Crime | salman khans co star rimi sen cheated of over rs 4 cr goregoan businessman booked

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत येरवडा येथील मुळीक कॉम्प्लेक्स मध्ये वाहनांची तोडफोड, तरुणावर वार; 4 जणांवर FIR

 

Compulsory Helmet Rule In Pune | पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा – कॉलेजच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना हेल्मेट सक्ती – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

 

Chris Rock On Will Smith Slap Controversy | विल स्मिथच्या ‘गालफटा’वर अखेर क्रिस रॉकनं तोडलं मौन; म्हणाला – ‘मी अजून विचार करतोय नक्की काय झालं होत?’