Mumbai Crime | धक्कादायक ! कुटुंबाला ठार करण्याची धमकी देत भोंदूबाबाकडून 4 महिलांसोबत घाणेरडं कृत्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | अनेक ठिकाणी सामान्यांना जादूच्या रुपाने पैशाच्या हावेने फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जात आहे. असे प्रमाण वाढताना दिसत आहे, मात्र अशाच पद्धतीने विरारमध्ये (Mumbai Crime) एका भोंदूबाबाने पैशाचे आमिष दाखवून 4 महिलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलांना भोंदूबाबाने अर्थिक गंडा देखील घातला आहे. त्याचबरोबर ‘जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन’, अशी धमकी देत पीडित महिलांवर अनेकवेळा अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी, आरोपींनी अशाच प्रकारे इतरही अनेक महिलांवर अत्याचार केला असावा. तसेच त्यांची आर्थिक फसवणूक केली असावी, असा संशय पोलिसांना (Mumbai Crime) आहे. त्यामुळे अर्नाळा सागरी दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहे. याप्रकरणी चारही पीडित महिलांनी विरार येथील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात (Arnala Sagari Police Station) फिर्याद (FIR) दाखल केली आहे. मॅथ्यू पंडियन (Matthew Pandian) असं अटक केलेल्या भोंदूबाबाचं नाव आहे. तर, दिनेश देवरुखकर (Dinesh Devrukhkar) असं अटक केलेल्या आरोपी साथीदाराचं नाव आहे.

 

विरार येथील रहिवासी असणाऱ्या एका 26 वर्षीय पीडित महिलेची आर्थिक परिस्थिती अडचणीची होती. दरम्यान, जुलै महिन्यात पीडित महिलेच्या ओळखीचा दिनेश देवरुखकरने तिला मॅथ्यू पंडियनची माहिती दिली. तसेच तुझ्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील, असं सांगितलं. आरोपी दिनेशच्या सागण्यावरुन पीडित महिला भोंदूबाबाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. आरोपी पंडियनने पूजा करण्यासाठी तिच्याकडून 10 हजार रुपये घेतले. तर, पूजा संपन्न झाल्यानंतर कोट्यावधी रुपयांचा पाऊस पडेल अशी बतावणी केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं पूजा करण्याच्या बहाण्याने पीडितेवर बलात्कार (Rape) केला. याबाबत काही सांगितल्यास ‘जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेन’ अशी (Mumbai Crime) धमकीही दिली.

दरम्यान, या पिडित महिलेबरोबर अन्य मैत्रिणीसोबतही असा प्रकार केला आहे.
दरम्यान, आपली फसवणुक झाल्याचे कळताच पिडित 4 ही महिलांनी
अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात (Arnala Sagari Police Station) भोंदूबाबा विरोधात फिर्याद (FIR) दिली.
यावरुन भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title :- Mumbai Crime | Shocking! Dirty act with 4 women by Bhondubaba threatening to kill the family

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वकांक्षा होती हे मान्य करा’ – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर का पडावं लागलं? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न (व्हिडिओ)

Gold Silver Price | धनत्रयोदशीच्या 18 दिवस अगोदर किती झाला सोन्याचा दर, ऑक्टोबरमध्ये चांदीत 3600 रुपयांपेक्षा जास्त वाढ