Mumbai Crime | धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने पत्नीला कारने चिरडलं; CCTV फुटेज आले समोर (व्हिडिओ)

पोलीसनामा ऑनलाईन – Mumbai Crime | चित्रपट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक कमल किशोर मिश्रा (Kamal Kishore Mishra) यांच्यावर पत्नीला कारने चिरडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पत्नीने कमलला दुसऱ्या महिलेसोबत पकडल्यानंतर हा सगळा प्रकार घडला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कमलविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. हि घटना 19 ऑक्टोबर रोजी पश्चिम अंधेरीतील एका निवासी इमारतीच्या पार्किंग परिसरात घडली. (Mumbai Crime)

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, पार्किंग एरियामध्ये एक महिला कार चालकाला थांबवते. पण तो थांबत नाही तो तशीच गाडी चालवत या महिलेला धडक देतो. यानंतर हि महिला खाली पडते आणि कार तशीच पुढे निघून जाते. यानंतर हे सगळे पाहून एक व्यक्ती धावत येऊन महिलेला कारखालून बाहेर काढतो. आपल्या पत्नीला कारने धडक दिल्याप्रकरणी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात (Aamboli Police Station) आएपीसी कलम 289 आणि 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime)

बॉलिवूड (Bollywood) निर्माता कमल किशोर मिश्रा यांच्या पत्नीने पोलिसांना जबाबात म्हंटले कि, ‘जेव्हा मी कमल किशोर मिश्रा यांच्या घरी गेले होते. तेव्हा ते आपल्या कारमध्ये एका दुसऱ्या महिलेसोबत बसले होते. ते त्या महिलेसोबत रोमँटिक होत होते. हे सर्व पाहून मी कारच्या खिडकीची काच ठोठावली. त्यांना खिडकी उघडण्यास सांगितलं. मला त्यांच्याशी बोलायचं असल्याचंही सांगितलं. परंतु त्यांनी माझं काहीच नाही ऐकलं. आणि ते कार चालू करुन पळ काढू लागले. यादरम्यान गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना मी गाडीखाली आले आणि त्यांनी मला चिरडले आणि पुढे निघून गेले. या सगळ्यात माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title :- Mumbai Crime | shocking famous producer kamal kishore mishra crushes wife with car

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | सोलापुरातील ‘या’ मोठ्या नेत्याने शिंदे गटात जाताच शिवसेना नेत्यांना सुनावले, पक्षनिष्ठा पक्षश्रेष्ठींना नाही का?

Esmayeel Shroff Passed Away | ज्येष्ठ दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचं निधन

Pune Crime | जमिनीच्या वादातून ट्रॅक्टर अंगावर घालून ४ वर्षाच्या मुलाचा केला खून; इंदापूरमधील घटना