Advt.

Mumbai Crime | IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याची होस्टेलच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, सुसाईड नोट सापडल्यानं प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | देशातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बे च्या (IIT Bombay) विद्यार्थ्याने काल रात्री (Mumbai Crime) आत्महत्या केली आहे. सूत्रानुसार असे समोर आले आहे कि विद्यार्थ्याने पहाटे साडेचारच्या सुमारास वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide in Mumbai) केली आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली असल्याचे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले आहे. सुसाईड नोटमध्ये तो डिप्रेशनमध्ये होता व त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यांनी कोणालाही जबाबदार धरले नाही. पुढील तपास सुरू आहे.

 

आत्महत्या करणारा 26 वर्षीय विद्यार्थी इंजिनीअरिंगच्या मास्टर्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता.
घटना स्थळाहून त्याला तातडीने मुंबईतील राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) दाखल करण्यात आले व तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सूत्रानुसार असे समोर आले आहे कि हा विद्यार्थी डिप्रेशनचा शिकार झाला होता.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.
विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावामागे काय कारण होते, याचाही शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Mumbai Crime)

 

Web Title :  Mumbai Crime | student of iit bombay died by suicide by jumping from the hostels 7th floor

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा