Mumbai Crime | राजघराण्याचा वारस असल्याचे सांगून 50 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक; गोरेगावातील टिक टॉक ‘हिरो’ला अटक

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – आपण राजस्थानमधील राजघराण्यातील वारस असल्याचे भासवून 50 पेक्षा जास्त महिलांची फसवणूक (Mumbai Crime) करणाऱ्या टिक टॉकवरील हिरोला गोरेगावमध्ये अटक करण्यात आली आहे. महिलांचे समाज माध्यमांवर फोटो प्रसारीत करण्याच्या धमकीने या तरुणाने महिलांकडून (Mumbai Crime) अनेकवेळा पैसे उकळले होते.

गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरे कॉलीनीतून पोखराज देवासी उर्फ राजवीर सिंह याला अटक केली आहे. राजवीर याने राजस्थानच्या महालांत आपले फोटो काढले होते. त्याने हे फोटो समाज माध्यामांवर (इंस्टाग्राम, टिक टॉक) प्रसारीत केले होते. त्यानंतर तो महिला आणि मुलींशी मैत्री करुन त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होता. अनेक महिला आणि मुली त्याच्या शाही घराण्याला भुलून त्याच्याशी मैत्री करत होत्या. यानंतर तो महिलांकडे त्यांचे खासगी फोटो मागत होता. आणि प्रेमात आंधळ्या झालेल्या मुली, महिला त्या देत होत्या. त्यानंतर त्याने त्याचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आणि ते फोटो प्रसारीत करण्याच्या धमकीने (Mumbai Crime) पैसे उकळणे सुरु केले, अशी माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली आहे.

अशाच प्रकारे गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक तरुणी या तोतया हिरोच्या जाळ्यात अडकली होती. त्याने तिला फसवून तिच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर या तरुणीने त्याला चार लाख रुपये दिले होते. पण त्याची भूक आणखीणच वाढली आणि त्याने तिच्याकडे आणखी पैशांचा तगादा लावला व पैसे न दिल्यास तिचे खासगी फोटो प्रसारीत करण्याची धमकी दिली. त्यानंतर या तरुणीने त्याच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या तरुणाला अटक केली.
त्याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीच्या विरोधात मागील वर्षी जुहू पोलीस ठाण्यात देखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता.
त्यावरुन त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता.
आरोपी पोखराज देवासी हा मूळचा राजस्थानचा आहे.
त्याने आतापर्यंत 50 पेक्षा जास्त महिला आणि मुलींची फसवणूक केली आहे.
पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title :-   Mumbai Crime | tik tok star arrested for extorting money from women by threatening to make private photos viral on social media mumbai crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | महिलेचा अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करुन केला व्हायरल, उत्तर प्रदेशातील तरुणावर FIR

Pune Police | पुण्यात नाईट ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचार्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue | सीमावादावरील गावांसाठी 2 दिवसांत मोठी घोषणा – चंद्रकांत पाटील