Mumbai Crime | अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचार, मुंबईतील मराठी शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस

मुंबई : Mumbai Crime | वर्गातील इतर विद्यार्थी नृत्याच्या सरावासाठी तळमजल्यावर गेल्याची संधी साधत दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच वर्गात शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १ नोव्हें) उघडकीस आली. सदर घटना मुंबईतील एका मराठी शाळेत घडली असून या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी थेट पोलिस ठाणे गाठून याबाबत रीतसर तक्रार नोंदवली असून या घटनेचे गांभीर्य ओळखून माटुंगा पोलिसांनी या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून दोन अल्पवयीन मुलांना डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवले असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. (Mumbai Crime)

मध्य मुंबईत सोमवारी एका मराठी शाळेतील एका घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे समोर आले आहे. या घटनेत १३ वर्षीय मुलीवर तिच्याच वर्गमित्रांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली असून माटुंगा पोलिसांनी सुद्दा यावर तातडीने पावलं उचलली आहे. यामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्गातील इतर विद्यार्थी नृत्याच्या सरावासाठी तळमजल्यावर गेले असता ही घटना घडली आहे. (Mumbai Crime)

या घटनेबाबत सांगताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आणि पीडिता इयत्ता आठवीत आणि एकाच वर्गात शिकतात. आजूबाजूला कोणी नसताना दोन अल्पवयीन मुलांनी वर्गात आपल्या वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला असल्याचे सांगितले. या घटनेनंतर मुलगी घाबरली, त्यामुळे तिने या घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना थोडी उशिरा दिली. त्यानंतर नातेवाईकांनी आम्हाला घटनेची माहिती दिली आणि आम्ही नातेवाईकाच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असल्याचे संबंधित पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पुढे पोलिस अधिकारी म्हणतात, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे आणि आम्ही दोन अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर केले, त्यानंतर त्यांना डोंगरी येथील बालगृहात पाठवण्यात आले आहे. मुलांनी पोलिसांकडे त्यांचे जबाब नोंदवले आहेत. ही घटना वर्गात घडल्याने आम्ही शाळेच्या अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवणार असल्याचे सुद्दा पोलिसांनी यावेळी नमूद केले आहे.

दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून पालक वर्गाकडून याबाबत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेमुळे शाळा प्रशासनामध्ये सुद्दा खळबळ उडाली असून शाळेतील सर्वांनाच धक्का बसला आहे.
आरोपी एवढ्यावरच थांबलेले नाहीत, त्यांनी अल्पवयीन मुलीला मारहाण करत याबाबत कोणाशीही बोलल्यास
गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी सुद्धा देण्यात आल्याचे पोलिसांनी यावेळी म्हटले आहे.

या घटनेमध्ये पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ डी-ए
(सोळा वर्षांखालील महिलेवर सामूहिक बलात्कार), ५०६ (गुन्हेगारी धमकावणे), ३४ (सामान्य हेतू) आणि
कलम ४ (प्रवेश लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायदा, २०१२ च्या कलम ६
(अग्रॅव्हेटेड पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार) या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title :- Mumbai Crime | two 13 year old boys gang rape classmate in classroom

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Restrictions In Mumbai | मुंबई पोलिसांकडून जमाबंदीचे आदेश जारी; 2 जानेवारीपर्यंत ‘कर्फ्यू’सारखी बंधनं, 5 हून अधिकजण एकत्र येण्यावर बंदी, जाणून घ्या संपूर्ण आदेश

BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूंची निवड

Pune Pimpri Crime | ‘पोलीस मला काही करु शकत नाहीत’ ! तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमियोवर FIR