Mumbai Cruise Drug Case | NCP नेते नवाब मलिकांच्या आरोपावर NCB ने दिले उत्तर, म्हणाले – ‘आम्ही ‘या’ कारणामुळं 3 नव्हे 6 लोकांना सोडले होते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Cruise Drug Case| महाराष्ट्रातील (Maharashtra) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ड्रग्ज प्रकरणावरून (Mumbai Cruise Drug Case) एनसीबीवर केलेल्या गंभीर आरोपानंतर आता नारकोटिक्सस कंट्रोल ब्यूरो (NCB) ने शनिवारी आपली बाजू मांडली. एनसीबीने म्हटले आहे की, क्रुझवर करण्यात आलेली छापेमारी आणि ड्रग्ज जप्तप्रकरणात एजन्सीवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आणि पूर्णपणे प्रेरित आहेत.

 

पक्ष किंवा धर्म पाहून कारवाई करत नाही : NCB
मागील शनिवारी एनसीबीच्या या छापेमारीमध्ये बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (ncb zonal director sameer wankhede) यांनी म्हटले की, एजन्सी कायदेशीर काम करत आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही कोणताही राजकीय पक्ष पाहून किंवा धर्म पाहून कारवाई करत नाही.

 

एनसीबी जबाबदार संस्था : ज्ञानेश्वर सिंह
एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंह (ncb deputy director general gyaneshwar singh) म्हणाले, अशी वक्तव्य गृहितकावर आधारित आणि दुर्दैवी आहेत. एनसीबीबाबत लोक काय म्हणतात त्यावर आम्ही टिप्पणी करणार नाही. त्यांनी म्हटले की, एनसीबी जबाबदार संस्था आहे. ती पुराव्यांच्या आधारावर काम करते. (Mumbai Cruise Drug Case)

 

6 जणांना सोडून दिले
एनसीबीचे म्हणणे आहे की, छाप्याच्या दिवशी 14 लोकांना एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणण्यात आले होते. त्यांना नोटीस जारी करून चौकशी करण्यात आली होती. परंतु, पुरावे न मिळाल्याने त्यांच्यापैकी 6 लोकांना सोडून देण्यात आले होते आणि 8 जणांना अटक करण्यात आली होती.

 

छापा बनावट, बाहेरील लोकांचा समावेश : मलिक
महाराष्ट्रातील ड्रगप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केल्यानंत या प्रकरणाने राजकीय वळण घेतले होते.
नवाब मलिक यांनी बुधवारी दावा केला होता की, हा छापा बनावट होता आणि यामध्ये बाहेरील लोकांचा समावेश होता.

मलिक यांनी आरोप केला होता की, एनसीबीने सुरूवातीला जहातून 11 लोकांना ताब्यात घेतले होते परंतु त्यांच्यापैकी तीन जणांना काही तासातच सोडून देण्यात आले.

 

कारवाईत सहभागी स्वतंत्र साक्षीदार
एनसीबीच्या एका अधिकार्‍याने शनिवारी मीडियाला सांगितले की,
मलिक यांनी छाप्यात सहभागी ज्या दोन लोकांना बाहेरील लोक म्हटले आहे, ते प्रत्यक्षात कारवाईत सहभागी नऊ स्वतंत्र साक्षीदार होते.
ते दोघे छाप्यापुर्वी एनसीबीसाठी अनोळखी होते.

Web Title :- Mumbai Cruise Drug Case | Mumbai Cruise Drug Case ncb gyaneshwar singh and sameer wankhede replies to ncp nawab malik allegations

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Waqf Board Land Scam Case | वक्फ बोर्डाची जमीन लाटणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला अटक; प्रचंड खळबळ

Baby Born Without Face | आश्चर्यकारक ! चेहर्‍याशिवाय झाला मुलीचा जन्म, डॉक्टर म्हणाले – ‘जगणार नाही आणि मग झाला ‘हा’ चमत्कार’

Dr Abdul Qadeer Khan Died | पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमाचे जनक डॉ. अब्दुल कादिर खान यांचे कोरोनाने निधन