Mumbai Cruise Drug Case | समीर वानखेडेंना मोठा धक्का ! आर्यन खान, नवाब मलिकांच्या जावयाच्या केससह 6 प्रकरणांचा तपास मुंबई झोनकडून काढला; पण…

वृत्तसंस्था – मुंबई ड्रग्ज केसबाबत (Mumbai Cruise Drug Case) मोठी माहिती समोर येत आहे. आता मुंबई एनसीबी या प्रकरणाचा तपास करणार नाही. या केसमध्ये शाहरूख खानचा (shah rukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) अडकला आहे. दरम्यान, याशिवाय राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाच्या विराधात सुरू असलेल्या प्रकरणाचा तपास देखील मुंबई झोनकडून ((Mumbai Cruise Drug Case) काढून घेण्यात आल्याचं वृत्त विविध मराठी आणि हिंदी वृत्त वाहिन्यांनी दिलं आहे. दरम्यान, प्रकरणाच्या तपासातून मला वगळण्यात आले नसून प्रकरणांचा तपास दिल्ली एनसीबीकडून (Delhi NCB) केला जाणार असल्याचं समीर वानखेडे (Sammer Wankhede) यांनी स्पष्ट केलं आहे.

 

एनसीबीच्या मुंबई झोनकडून आर्यन खानसह एकुण 6 केस (Mumbai Cruise Drug Case) परत घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे एनसीबीचे डायरेक्टर समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे. आर्यन खान आणि नवाब मलिक यांच्या जावयाच्या केसचा तपास जरी मुंबई झोनकडून परत घेण्यात आला असला तरी मुंबई झोनचे डायरेक्टर समीर वानखेडे हे त्या पदावरच आणि मुंबई झोनमध्येच कार्यरत राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
एवढेच नव्हे तर त्यांच्याविरूध्द तक्रारीचा पाढाच वाचला होता.
गेल्या अनेक दिवसांपासुन नवाब मलिक विरूध्द समीर वानखेडे असा जोरदार सामनाच सुरू असल्याचं चित्र आहे.
त्या दरम्यानच केंद्रात सत्ताधार आणि राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांनी (Maharashtra BJP Leader)
समीर वानखेडे यांना पाठिंबा दर्शविला होता तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी
समीर वानखेडे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन वानखेडे यांना पाठिंबा दर्शविला होता.
आता आर्यन खान, नवाब मलिक यांच्या जावयासह इतर 6 प्रकरणे
एनसीबीनं मुंबई झोनकडून (NCB Mumbai Zone) परत घेतल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे
तर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे.

 

दरम्यान, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मला तपासामधून वगळण्यात आलेलं नाही. प्रकरणाचा तपास सेंट्रल एजन्सीकडून करण्यात यावा म्हणून न्यायालयात मीच याचिका दाखल केली होती. त्यामुळे आता आर्यन खान आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटी Delhi NCB SIT (विशेष तपास पथकाकडून) करण्यात येणार आहे. एनसीबी मुंबई आणि दिल्लीच्या टीम समन्वय साधणार आहेत.

 

Web Title :- Mumbai Cruise Drug Case | ncb officer sameer wankhede removed from investigation of aryan khan drug case and sameer khan son in law of nawab malik case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा