Mumbai Cruise Drug Case | नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट ! म्हणाले – ‘भाजप नेत्याचा तो मेहुणा कोण?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मालिकांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीने (NCB) धाड टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश (Mumbai Cruise Drug Case) केला. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली असून त्यात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यांचाही समावेश आहे. दरम्यान, एनसीबीच्या कारवाईवर (Mumbai Cruise Drug Case) नवाब मलिकांनी (Nawab Malik) काही गंभीर आरोप केलेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मलीक यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एनसीबीने आठ लोकांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितलं होतं. परंतु एनसीबीनं 11 जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिघांना सोडण्यात आले. त्यात रिषभ सचदेवा (Rishabh Sachdeva), प्रतिक गाबा (Pratik Gaba), अमीर फर्निचरवाला (Amir Furniturewala) या तिघांना सोडून देण्यात आले. रिषभ सचदेवा याचा भाजप (BJP) नेत्यांशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. रिषभ सचदेवा हे भाजप युवा मोर्चाचे मोहित भारती (Mohit Bharti) यांचा मेहुणा आहे. रिषभ सचदेवा हे राष्ट्रपतींना पण भेटले आहे, आणि राष्ट्रपती यांनी पुरस्कृत केलं आहे. रिषभ सचदेवा यांना दोन तासात सोडण्यात आले. जेव्हा सुनावणी सुरु होती तेव्हा त्याचं नाव Reflect झालं होतं. यांच्याच बोलवण्यावरुन आर्यन आला होता, असा खुलासा मलिकांनी केला आहे.

या 3 लोकांना सोडण्याचे आदेश कुणी दिले हे एनसीबी ला सांगावे लागेल, असा सवाल मालिकांनी एनसीबीला विचारलं आहे. आम्ही मागणी करतोय की वानखेडे यांनी याचा तात्काळ खुलासा करावा, असंही मलिक यांनी म्हटले. एनसीबीच्या (Mumbai Cruise Drug Case) चुकीच्या कामांची माहिती तुमच्यासमोर आणली होती. ज्या दिवशी छापेमारी (Mumbai Drug Case) केली त्या दिवशी समीर वानखेडे ने 8 ते 10 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. एक जबाबदार अधिकारी असं कसं म्हणू शकतो. तीन लोकांना सोडून देण्यात आलं का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला.

 

वानखेडेंच्या फोनचे डिटेल्स काढा

रिषभ सचदेवा यांच्या बाबांच्या फोनवर महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील भाजप नेत्यांचा फोनवर वानखेडे यांचं बोलणं झालं, असा आमचा आरोप असल्याचं मालिकांनी म्हटलं आहे.

शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट
कारवाई दरम्यान भाजप नेत्याच्या एका मेहुण्याला सोडून दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता.
क्रूझवरील ड्रग्स पार्टीतून ताब्यात घेतलेल्यांपैकी दोन जणांना सोडण्यात आलं, असं म्हणत त्यात भाजप नेत्याचा एक मेहुण्याला सोडून देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मलिक यांनी केला होता.
भाजप नेत्याचा मेहुणा कारवाईतून कसा सुटला ? असा सवाल देखील मलिक यांनी काल केला होता. त्याचाच आज खुलासा मलिकांनी केला आहे.

 

Web Title :- Mumbai Cruise Drug Case | rishabh sachdeva has links with bjp leaders? nawab malik press conference revealed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | सन्मान स्त्री शक्तीचा ! कर्तृत्ववान महिलांचा वडगावशेरी भाजपकडून सन्मान

Rakesh Jhunjhunwala | नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकाराने विचारला प्रश्न, यावर राकेश झुनझुनवाला यांनी दिले हे उत्तर (व्हिडीओ)

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा राणेंवर पलटवार, म्हणाले – ‘सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, कोणी म्हणेल मीच बांधला’ (व्हिडीओ)