Mumbai Cruise Drugs Case | कोण आहेत आर्यन केसमधील नवीन NCB अधिकारी संजय सिंह, ‘या’ प्रकरणांचा केला होता तपास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  क्रुझ ड्रग्ज केस (Mumbai Cruise Drugs Case) च्या तपासाची जबाबदारी आता NCB अधिकारी संजय सिंह (NCB official Sanjay Singh) करतील. NCB ने वादग्रस्त ठरलेले तपास अधिकारी समीर वानखेडे (investigating officer Sameer Wankhede) यांना तपासातून बाजूला केले आहे. आता त्यांच्या ठिकाणी NCB अधिकारी संजय सिंह आर्यन खानच्या ड्रग्ज केस (Aryan Khan’s drug case) सह इतर 6 प्रकरणांचा सुद्धा तपास करतील. NCB चे नवीन तपास अधिकारी संजय सिंह यापूर्वी सीबीआयमध्ये (CBI) डेप्युटी इन्स्पटेक्टर जनरल होते. (Mumbai Cruise Drugs Case)

 

संजय सिंह 1996 च्या बॅचचे IPS अधिकारी

 

संजय सिंह 1996 ओडिसा बॅचचे आयपीएस अधिकारी (IPS Officer Sanjay Singh) आहेत.
सध्या संजय सिंह NCB मध्ये डेप्युटी डायरेक्टर जनरल (ऑपरेशन) च्या पदावर कार्यरत आहेत.

 

IPS संजय सिंह यांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड

 

आयपीएस संजय कुमार सिंह यांनी ओडिशामध्ये अँटी ड्रग्ज टास्क फोर्सचे सुद्धा नेतृत्व केले आहे.
संजय सिंह जोपर्यंत CBI मध्ये होते तोपर्यंत त्यांनी अँटी ड्रग्ज टास्क फोर्सचे नेतृत्व केले होते.
संजय सिंह यांच्या नेतृत्वातच 2010 च्या कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याचा तपास करण्यात आला होता.
आता संजय सिंह यांना आर्यन खान ड्रग्ज केससह इतर 6 प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पाच इतर प्रकरणे सुद्धा बॉलीवुड सेलिब्रिटीं आणि ड्रग्ज संबंधीत आहेत.

Web Title : Mumbai Cruise Drugs Case | mumbai cruise drugs case know who is ncb officer sanjay singh has investigated commonwealth scam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Whatsapp New Update | आता 4 डिव्हाईसमध्ये चालेल व्हॉट्सअ‍ॅप, मोबाइल इंटरनेट कनेक्शनची सुद्धा नाही गरज; जाणून घ्या

CBSE | सीबीएसईने 10 वी – 12 वी च्या परीक्षेबाबत घेतला मोठा निर्णय ! जारी केली नवीन मार्गदर्शकतत्त्वे

Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…