Mumbai Cruise Drugs Case | ‘ही तुमची शूटिंग किंवा प्रोडक्शन हाऊस नाही’; चौकशीसाठी उशिरा आलेल्या अनन्या पांडेला समीर वानखेडेंनी सुनावलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Cruise Drugs Case | मुंबईच्या समुद्रात क्रूझवर अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मोठी छापेमारी करत ड्रग्ज पार्टीचा (Mumbai Cruise Drugs Case) पर्दाफाश केला होता. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. त्यात बॉलिवूड अभिनेता (Shah Rukh Khan) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) अनेकांना एनसीबीने अटक (Arrested) केली आहे. याप्रकरणात आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेना (Ananya Panday) समन्स देण्यात आला होता. त्यांचीही चौकशी सुरू करण्यात आलीय. अभिनेत्री एनसीबी कार्यालयात लेट पोहचल्याने NCB अधिकारी समीर वानखेडेने तिला चांगलंच सुनावलं आहे.

 

ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचं (Ananya Panday) नाव समोर आलं आहे. यामुळे तिला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान, अनन्याला 2 वाजता NCB कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण, यावेळी अभिनेत्री 2 तास उशिरा म्हणजेच 4 वाजता पोहोचली होती. त्यामुळे तिची योग्य तशी चौकशी झाली नव्हती. त्यांनतर शुक्रवारी पुन्हा तिला बोलावलं. त्या दिवशीही 11 ला बोलावण्यात आलं होतं. पण ती चक्क 3 तास उशिरा म्हणजेच 2 वाजता कार्यालयात हजर राहिली.

 

या सततच्या उशीरा हजेरी लावल्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांनी तिला चांगलंच सुनावलं आहे. त्यावेळी वानखेडे म्हणाले की, ‘हे तुमचं शूटिंग नाही. किंवा तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही. हे NCB चं कार्यालय आहे. याठिकाणी दिलेल्या निश्चित वेळीच तुम्हाला यावं लागेल. अधिकाऱ्यांना तुमच्यासाठी वाट बघत बसायला वेळ नाही’. असं म्हणत त्यांनी अभिनेत्रीला चांगलंच धारेवर धरलं आहे.

दरम्यान, आर्यन खान आणि अनन्या या (Mumbai Cruise Drugs Case) दोघांच्या चॅटसंदर्भात एनसीबी (NCB) चौकशी करीत आहेत.
या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये (WhatsApp Chat) आर्यन खान आणि अनन्या पांडे गांजाबद्दल बोलत होते.
तसेच त्यांच्यात पुढील बोलणं झालं असल्याचं सुत्राकडून सांगण्यात आलं आहे.
तर, अनन्या पांडे सोबत याबाबत गुरुवारी चौकशी करण्यात आली.
त्यावेळी अनन्या म्हणाली की, आर्यन खानसोबत ती मस्करी करीत होती.
असं सूत्रांनुसार समजते. याशिवायही त्यांच्याजवळ असे अनेक चॅट्स आहेत,
ज्यात दोघे विविध ठिकाणी अंमली पदार्थ (Narcotic Substances) बद्दल बोलत होते.

 

Web Title :-  Mumbai Cruise Drugs Case | Not a production house : What Sameer Wankhede told Ananya Panday for arriving late at NCB office

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील सिंहगड रोडवर चौथ्या मजल्यावरुन उडी मारून 26 वर्षीय महिलेची आत्महत्या; प्रचंड खळबळ

Pune Crime | ‘गुंडगिरी’चा शेवट ‘गुंडगिरी’तूनच ! संतोष जगतापचा खून 2011 च्या मर्डरच्या बदल्यासाठी? जाणून घ्या संपुर्ण स्टोरी

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळील ‘सेल्फी पॉईंट’ येथे भीषण अपघात; 3 ठार तर 12 जखमी, दोघे चिंताजनक (व्हिडिओ)